“राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? “, CM Devendra Fadnavis मनमोकळेपणाणे म्हणाले…

82
"राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? ", CM Devendra Fadnavis मनमोकळेपणाणे म्हणाले...

नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभात देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यावर फडणवीसांनीही आपल्या शैलित प्रश्नांची ‘राजकीय’ उत्तरं दिली. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी त्यांची मुलाखत घेतली. राजकीय घडामोडी, विधानसभा, लोकसभा, मुख्यमंत्रीपद या सर्वच प्रश्नांना फडणवीसांनी मनमोकळेपणे उत्तर दिली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ? एकनाथ शिंदे (Eknath Shinde) की अजित पवार (Ajit Pawar)? असे प्रश्न विचारण्यात आले.

राज ठाकरे की उद्धव ठाकरे?
मुलाखतीच्या रॅपीड फायरमध्ये देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी म्हटलं की, “राजकारणात काहीही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत.”

अजित पवार की एकनाथ शिंदे?
“माझ्यापुरतं विचारलं तर माझे दोघांशी देखील अतिशय चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. तसेच अजित पवार यांच्यामध्ये एक राजकीय परिपक्तवता असल्यामुळे त्यांचे आणि माझे सूर मोठ्या प्रमाणात जुळतात.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. (CM Devendra Fadnavis)

कठोर राजकारणी कोण, मोदी की शहा?
मला असं वाटतं की मोदीजी हे कठोर पेक्षा अनुशासित राजकारणी आहेत, त्यांनी जीवनात जो मार्ग पकडला त्या मार्गावरु कितीही अडचणी आल्या तरी आजूबाजूला व्हायचचं नाही, हे जे अनुशासन लागतं ते फारत कठीण आहे. माझ्यात त्यातील 10 टक्केही अनुशासन नाही. त्यामुळे, कठोर नाही तर मोदीजी अनुशासित आहेत. अमितभाई ह्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचा निर्णय करण्याचे आपण म्हटले तर, मोदीजी सोयीचा निर्णय घेणार नाहीत. पण, अमितभाईंना पटवून आपण साईचा निर्णय घेऊ शकतो. (CM Devendra Fadnavis)

राजकीय जीवनात घालमेल घडणारा प्रसंग घडल्यास कोणाशी बोलायला आवडेल, नितीन गडकरी की मोदी?
नितीनजी हेच आपल्याला उपलब्ध आहेत, नरेंद्र मोदींकडे आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्न घेऊन जाणार. पण,आपले छोटे-छोटे प्रश्न घेऊन जाणार. मोदींची एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे ती म्हणजे, मोदी हे आमदार, खासदार यांनीही भेटीसाठी वेळ मागितला तर ते देतात, कौटुंबिक चर्चा करतात. तुमच्या अडचणी समजून घेतात, त्यामुळे मोदींचा स्वभाव वरुन कठोर असला तरी ते हळवे आहेत. आपण, पंतप्रधानांना दररोज भेटू शकत नाहीत, पण त्यांना भेटलो तर चार गोष्टी बोलता येतात, कितीही वेळ बोलता येते, ते ऐकून घेतात असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिली. (CM Devendra Fadnavis)

राष्ट्रीय अध्यक्ष होणे आवडे की मुख्यमंत्री?
जे पक्ष सांगेल ते करायचं. देवेंद्र फडणवीस हा इतका मोठा झाला, ती त्याची क्षमता होती म्हणून नाही. तर, आज महाराष्ट्रात भाजपमध्ये अनेक नेते होते. कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. पण, त्यावेळी त्यांना संधी न मिळता मला मिळाली. माझ्या नावापासून भाजप काढून टाकलं तर मला कोणी विचारणार सुद्धा नाही. मी जर भाजपशिवाय उभं राहिलो तर सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील. माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पार्टी आहे. पक्ष ज्या दिवशी सांगेल घरी जा तेव्हा मी घरी जाईल एक प्रतिप्रश्न करणार नाही, असे उत्तर फडणवीसांनी दिले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.