वाढत्या लोकसंख्येबाबत Raj Thackeray स्पष्टच बोलले; म्हणाले, इथला माणूस बेघर होतोय आणि…

65
वाढत्या लोकसंख्येबाबत Raj Thackeray स्पष्टच बोलले; म्हणाले, इथला माणूस बेघर होतोय आणि...
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून मुंबईत बाहेरुन आलेल्या लोकांसाठी सुविधा पुरवल्या जात आहेत. आज बाहेरची लोक येतात, झोपड्या बांधतात आणि घरे मिळवतात. पण इथल्या माणसाला काय मिळते. इथला माणूस सुखी असेल तर मग बाहेरच्यांना सांभाळून घ्या ना! पण इथला माणूस बेघर होत असेल तर बाहेरच्यांना सांभाळून कसे घ्यायचे? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे शहराचे विकास नियोजन हे पाच ते दहा वर्षांचे नसावे तर सुमारे ३०० ते ४०० वर्षांचे असावे असाही सल्ला नियोजन प्राधिकरणासह सरकाराला दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विधानसभेच्यावतीने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील वाढत्या लोंढ्यांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कोळी समाज लोक हे महाराष्ट्राचे मालक आहेत. मग तुम्ही कसले भांडतात. इथे बाहेरून येऊन झोपड्या वसवतात आणि फुकटात घरे घेऊन जातात. यावेळी वांद्रे कुर्ला संकुलातील झोपडीधारकांचा किस्सा सांगून त्या झोपडीधाकांना २० वर्षांपूर्वी अनधिकृत घर असताना त्यांचे १ कोटी रुपये दिले जात होते. आज दोन कुटुंबांमागे एका गाडीचे पार्किंग दिले जाते. पण तुमचा विचारच केला जात नाही. कारण तुम्हाला किंमतच नाही. प्रकल्प येतो, पण तुमचा विचारच केला जात नाही.

(हेही वाचा – रस्ते दुरुस्त करा… उगाच मला शिव्या पडतात ; केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचं राज्य सरकारला अल्टिमेटम)

असे प्रकल्प असताना आधी तुमच्याशी बोलले पाहिजे, तुमचा विचार, मते जाणून घ्यायचाला हवीत. पण आधी प्रकल्प लादायचा मग काय पाहिजे ते विचारले जाते. हे फक्त वरळीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चालले आहे. मुंबईचा विकास आराखडा बनवला जातो, पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. त्यामुळे लोकसंख्या किती वाढणार? लोकसंख्येनुसार रस्ते आहे का? कॉलेज, शाळा, रुग्णालय, डॉक्टर, बाजार, मराठी नाटक थिएटर किती असतील हे कुणी विचारणारच नाही. पण आम्ही फक्त चौरस फुटावर अडकलोत, तुमची हक्काची जमीन, पण तुम्ही प्रश्न विचारत नाहीत, अर्धे इकडे, अर्धे तिकडे, फक्त फोडाफोडी, बिल्डर अवलादच तशी असते, त्यांचा हेच हवे असते, तुम्ही स्वत: एकत्र राहणे गरजचे आहे, एकत्र राहत एकमुखाने विचार करणे गरजचे आहे, संदीप देशपांडे यांनी वरळीचे व्हिजन ठेवले आहे, व्हिजन महाराष्ट्राचे असावे, पण ते व्हिजन दहा वर्षांचे असून उपयोग नाही, तर २०० ते ३०० वर्षांचे असावे, तसा विचार करायचा असतो.

विकास कुणासाठी आणि कशासाठी? स्थानिक लोकाचा काय फायदा?

मुंबईत बेस्टची लाल बस, काळी पिवळी टॅक्सी ही या शहराची ओळख आहे. पण आता या शहराची ओळख काय तर काहीच नाही, उड्डाणपूल होतात कशाला? विकासकाला विरोध नाही, पण कुणासाठी आणि कशासाठी असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. माणसे वाढायला लागलीत, मुंबईतील बाहेरुन आलेली लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे सुविधा, रस्ते, उड्डाणपूल, इमारती, मुंबईत वाढत जात आहे. पण यात स्थानिक लोकांचा काय फायदा. बाहेरच्या लोकांसाठी हे होत आहे. इकडचा शेतकरी आत्महत्या करतो, पण यासर्व सुविधांवर खर्च होतो. ठाणे जिल्हा हा एका जगाच्या पाठीवर असा जिल्हा मिळणार नाही, ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली, बाहेरच्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ठाण्यात आहे. आधी ते ठाण्यात येतात, मग मुंबईत व पुण्यात, मग कुठे जातात या सुविधा. इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा आला तर सांभाळून घेऊ, पण इथला माणूस बेघर होतो मग बाहेरच्याला कसे सांभाळून घ्यायचे. निवडणुकीमुळे कुणाचे लक्ष नाही, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असेल.

(हेही वाचा – लाडकी बहीण योजनेत काही कमी पडू देणार नाही; DCM Ajit Pawar यांची ग्वाही)

स्मारक बांधायचे असेल तर २० ते २५ हजार कोटींचा खर्च…

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय काँग्रेस सरकार काळात झाला. याला पहिला विरोध मी केला. समुद्रात महाराजांचा पुतळा बांधून नका, त्या त्याऐवजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले दुरुस्त करा, ही भूमिका मी मांडली. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधायचे असेल किमान २० ते २५ हजार कोटी रुपये लागतील, त्यापेक्षा त्याचे गड कल्ले दुरुस्त करून करून महाराजांचा इतिहास दाखवा.

संदीप आमचा हिरा

संदीप देशपांडे हा आमचा हिरा आहे. खरंच हिरा आहे. बाकीचे पण आहेतच, पण संदीप हा अंत्यंत या भागासाठी जागृत असणारा मुलगा आहे. अत्यंत अभ्यासू आणि विषयावर बोलणारा आहे. होणार असेल तर स्पष्टपणे होय म्हणेल… नाहीतर नाही! आता तुम्ही संकल्पना द्या, आम्ही सर्देव तुमच्या सोबत आहोत. हा भाग चांगला व्हावा, माहिम किल्ला अतिक्रमण मुक्त करून सोडवून घेतला. तसे सर्व सोडवून घेऊ. जो चांगला करणारा असेल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारा. जर चांगले करूनही त्यांच्या पाठिशी शाबासकीची थाप बसणार नाही आणि ज्याने राजकीय, सामाजिक तसेच इतर बाबींमध्ये गोंधळ घालून ठेवलाय, त्याला जर शाबासकीची थाप बसणार असेल तर तुम्हाला काय बोलणार असा सवाल करत कोण उपयोगाला येणार आणि कोण उपयोगाला येणार नाही हे तुम्हीच ठरवा. आमच्याकडून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू, जे शक्य आहे तेवढे देऊ असेही आश्वासन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाषणाच्या शेवटाला दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.