मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौ-यावर आहेत. या दरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, अनेक विषयांवर भाष्य केले. सोबतच, मनसेची नागपूरची कार्यकारिणी बरखास्त केल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरही टीकास्त्र डागले आहे.
आधी आघाड्या होतात. जनतेला त्या सांगितल्या जातात. मग मतदान होते, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्याप्रकारे निर्णय घेतले जातात. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे बोलत होते , त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी का आक्षेप घेतला नाही. नंतर अचानक बंद खोल्यांमध्ये काही गोष्टी ठरल्याचे म्हणता आणि अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद मागता, असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
( हेही वाचा: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त, ‘या’ दिवशी होणार नवी कार्यकारिणी जाहीर )
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी का आक्षेप घेतला नाही?
राज ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात भाजपने कधीच मुख्यमंत्री पदाची मागणी केली नाही. त्यावेळी 1989 साली ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे ठरले होते. मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होतं, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्याप्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी, अमित शहा हे प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मु्ख्यमंत्री होणार असे बोलत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. हा मतदारांचा अपमान आहे. या सगळ्या गोष्टी मतदारांसमोर येणे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community