शहर नियोजनाविषयी परखड शब्दांत भाष्य करताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं. सत्ताधाऱ्यांची दृष्टी असेल, तर शहराच्या नियोजनात ती प्रतिबिंबित होते, असं सांगतानाच राज ठाकरेंनी मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. मुंबईतील रस्ते बांधून बाहरच्यांसाठी सोय करताना तिथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे, असं म्हणतानाच राज ठाकरेंनी पुणे शहर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली. “शहरं सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, तरच ती खाली उतरते. नाहीतर तुम्ही खाली कितीही टाहो फोडा, त्याचा काहीही उपयोग नाही. महापालिकेत टाऊन प्लॅनिंगमध्ये इंजिनिअरला महत्व आहे पण आर्किटेक्टला नाही. पुण्यात एका कार्यक्रमात त्यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. (RAJ THAKREY)
यावेळी पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, मी एका चांगल्या शहरात जगतो आहे असं जर मला वाटलं तर त्या जगण्याला अर्थ आहे. कारण तुम्ही रस्त्यानं जात असताना खड्ड्यात पाय पडतो, पाय मुरगळतोय, फुटपाथ नीट मिळत नाहीत, आणखी काय काय होतं. याला जगणं म्हणत नाही तुमचा जन्म झालाय म्हणून जगता. अनेक तरुण-तरुणी म्हणतात की आम्हाला परदेशात जायचंय, पण काय जायचंय? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतंय पण सभोवलातलंच वातावरण त्यांना मिळत नाही. (RAJ THAKREY)
(हेही वाचा : Emergency Landing : ‘माझ्या बॅगमध्ये बॉम्ब आहे’; अक्सा एअरच्या विमानाला प्रवाशाकडून धमकी)
तर पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही
मी गेले २५ एक वर्षे पुण्यात येतोय. पुण्यात ही गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणातून सांगितली आहे. मुंबई बरबाद व्हायला एक काळ गेला. पुणं बरबाद व्हायला वेळचं लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलं आहे. पाच पाच पुणे आहेत.एक हिंजवडीचं वेगळं, नदीकाठचं वेगळं, विमाननगरचं वेगळं असं पुणं झालं आहे. पुणं म्हणून कुठं राहिलंय याचा कारण राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष. त्यांना हे कळलं पाहिजे की टाऊन प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे. कुणाचा कशाला काही संबंधच उरलेला नाहीये. पुणं म्हणून कुठे काही राहिलंय? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाहीये”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी पुण्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.
कोकणातील ब्रिज दुर्घटनेचाही केला उल्लेख
दळणवळण आल्यानंतर आजूबाजूच्या सर्व गोष्टी बदलायला लागतात हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे की याचं टाऊन प्लॅनिंग आत्ताच करायला पाहिजे. पण ते होत नाही. कारण ती व्यवस्थाच नाही. ज्यांना यातली काही माहिती नाही, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? मग तुम्हाला महापालिका वा राज्य सरकारकडून हेच निकाल मिळणार. परवा कोकणातला ब्रिज कोसळला, कुणाला काही सोयरसुतक नाही. १५ मिनिटांची बातमी आली, विषय संपला”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community