सध्या धारावीचा (Dharavi) पुनर्विकासाचा मुद्दा पेटलेला आहे. या भागाचा विकास अदानीच्या माध्यमातून करून भाजप अदानींचा फायदा करून देत आहे, त्यामुळे याला विरोध करत धारावीचा विकास सरकारने करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मुंबईत मोर्चाही काढण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता (Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला आहे.
(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊदचा बालेकिल्ला डोंगरातील पाकमोडिया स्ट्रीट वर ‘सन्नाटा’)
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?
तब्बल दहा महिन्यांनी जागे झालेल्या महाविकास आघाडीने धारावीत (Dharavi) नेमके काय होणार हा प्रश्न विचारला का ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. पुढे बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की; “मी बिडीडी चाळीच्या इथं पाहणीला गेलो होतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर मी विचारलं होतं, तिथे शाळा किती, रस्ते कसे होणार, किती इमारती होणार, टाऊन प्लॅनिंग काय आहे हे सांगावं लागतं. एक मोठा भाग घेतला आणि अदानी यांना दिला असं थोडी असतं. नुसते मोर्चे काढून, दबाव आणून सेटलमेंट करायचे आहेत का हे मविआ नेत्यांना विचारा” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Parliament Security: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्माचा कुटुंबियाशी संवाद, व्हिडियो कॉलवर काय बोलला? वाचा सविस्तर…)
अदानींकडे असं काय आहे ?
पुढे बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “मुंबईमध्ये जो मोठा प्रकल्प येतोय तो परस्पर अदानींना का दिला इथपासून याची सुरुवात होते. त्यांच्याकडे असं काय आहे, म्हणजे विमानतळ, कोळसा खाणी यासारख्या बाकीच्या गोष्टी तेच हाताळू शकतात. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी टाटांसारख्या अनेक बड्या कंपन्यांकडून तुम्ही टेंडर मागवायला हवी होती. डिझाईन मागवायला हवे होते. तिथे नेमके काय होणार हे कळायला हवे पण हे असे काही झाले नाही.” (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community