Raj Thackeray: इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ‘ती’ वीट देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात

बाळा नांदगावकर 1992 मध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळी कारसेवक म्हणून ते अयोध्येत गेले होते.

225
Raj Thackeray: इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची 'ती' वीट देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात
Raj Thackeray: इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची 'ती' वीट देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शनिवारी पुण्यात आले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात (Pune) आले. ही वीट काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS leader Bala Nandgaonkar) यांनी त्यांना दिली होती.

बाळा नांदगावकर 1992 मध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळी कारसेवक म्हणून ते अयोध्येत गेले होते. त्यांनी येताना मशिदीची वीट (Babri Masjid brick) आपल्यासोबत आणली होती. ती वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच दिली. राज ठाकरे ही वीट घेऊन पुण्यात आले.

(हेही वाचा – Gyanvapi Masjid Case : तृणमूलच्या ‘या’ नेत्याने दिला योगी आदित्यनाथांना धमकी वजा इशारा)

पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात राज ठाकरे आले. यावेळी त्यांनी शिवकालीन पत्राची पाहणी केली. त्यानंतर इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ‘ती’ वीट दिली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्याकडे महापुरुषांना जातीत पाहतो. त्यावरून राजकारण केले जाते.

इतिहासावर संशोधन करणारी संस्था…

हजारो वर्षांचा इतिहास खासकरून महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा इतिहास नक्की वाचला पाहिजे. हा इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं ? हे शिकायला मिळालं पाहिजे. त्यामुळे तो वाचला पाहिजे. इतिहासावर संशोधन करणारी ही संस्था आहे. या संस्थेसाठी मला काहीतरी कारवासे वाटते. यामुळे मी संस्थेला २५ लाख रुपये देत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.