माझ्याभोवती हुजरेगिरी करणारे पदाधिकारी नकोत! राज ठाकरेंचा नेत्यांना इशारा

181

निवडणूक येतील मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही संपूर्ण ताकदीनिशी उतरा, राज ठाकरे संपूर्ण महापालिका तुमच्या हातामध्ये आणून देतो. त्यासाठी तुम्ही घराघरात पोहचले पाहिजेत. आपले काम लोकांसमोर मांडले पाहिजे, कोण नेता, पदाधिकारी काम करत नसेल, तर माझ्यापर्यंत या, मला कळवा, माझ्या स्वतःभोवती हुजरेगिरी करणारे नकोत. या पदाधिकाऱ्यांवर तुमचा अंकुश असला पाहिजे, असा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना  इशारा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी, २७ नोव्हेंबर रोजी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते. ही सभा गोरेगाव नेस्को येथे होती.

निवडणुकांचे वातावरण नाही 

मार्चमध्ये निवडणुका होतील, असे वाटत होते, पण आता डिसेंबर आला, आता कानावर येत आहे कि फेब्रुवारीला लागतील, पण अजून वातावरणात निवडणूक वाटत नाही, कारण महाराष्टात सगळाच  खोळंबा झाला आहे, त्यामुळे नक्की काय होईल, या गटाला मान्यता मिळणार कि नाही, त्या गटाला चिन्ह मिलनात कि नाही, माहित नाही, त्यांना त्यांची डोकी खाजवुद्या! रेल्वेच्या एका आंदोलनामुळे महाराष्ट्रातील हजारो मराठी मुला-मुलींना नोकऱ्या लागल्या, मराठीत प्रश्नपत्रिका आल्या. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, काय चालले माहित नाही. २०१४मध्ये मी हेच म्हणालो, उद्या या देशाचे पंतप्रधान मोदी जर झाले, तर त्यांनी पहिली ५ वर्षे बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंड या राज्यांकडे लक्ष द्यावे. आजही २ प्रकल्प जात आहेत, मला वाईट वाटत नाही. ज्या ज्या राज्यांना मागासलेपणा आहे, तिथे जाऊदेत. प्रत्येक राज्य मोठे झाले, तर देश प्रगल्भ होतो. देश हा सर्व राज्यांचा समूह आहे, मोदींनी गुजरात गुजरात करून नये, अशी अपेक्षा होती, सर्व राज्ये त्यांची अपत्ये आहे, हीच आपली धारणा होती आणि आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा राज ठाकरेंचे भोंग्यांविरोधात पुन्हा रणशिंग; ‘अरेला का रे’ करा!)

राज्यात जातीपातीचे वातावरण 

उद्योगधंद्यांवर धोतर बोलले नाही, वय काय बोलतो काय, काय चालले आहे? राज्यपाल पदावर बसला आहात, म्हणून मान राखतोय, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. महिनाभरापूर्वी काय म्हणाले होते, इथले गुजराती-मारवाडी निघून गेले तर काय होईल? कोश्यारी आधी त्यांना विचारा, तुम्ही तुमचे राज्य सोडून इथे का आलात? कारण उद्योग-धंदे थाटण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्र मोठाच होत आणि मोठाच राहणार. देश नव्हता तेव्हा या भागला हिंद प्रांत म्हणत. पर्शियन लोक असे म्हणत होते, यावर अनेकांनी आक्रमणे केली, पण या प्रांतावर सव्वाशे वर्षे खऱ्या अर्थाने राज्य केले असेल तर मराठेशाहीने केले. महाराष्ट्र कसा होता हे कोश्यारींकडून ऐकायचे नाही. आज गुजराती, मारवाडी यांनी परत जा म्हटले तर जातील का, काही लोकं सभोवतालचे वातावरण खराब करत आहे, आजही कोणता नवीन उद्योग यायचा असेल, तर त्यांचे पहिला प्राधान्य महाराष्ट्र असतो, हल्ली कोणी काहीही बरळतो, या राजकीय पक्षांचे प्रवक्ते काय बोलतात, कोणती भाषा वापरतात, मी असा महाराष्ट्र आजवर कधी बघितला नाही. एक मंत्री एका महिला नेत्याला भिकारचोट म्हणतो, तेव्ही टीव्हीवर, इतक्या खाली आपल्याला जायचे असेल तर त्यांची नावे घ्यायचे आधी बंद करा. काय भाषा असते त्यांची? काय काय प्रवक्ते असतात, बोन्सायचे झाड जसे असते, एवढेच असते! तू कोण आहे लायकी काय, काय बोलतो, आता शाळेत असलेली तरुण मुले-मुले जेव्हा हे प्रवक्ते पाहत असतील, तर त्यांना वाटत असेल हेच का राजकारण, सोपे आहे.  आमच्या साधू संतांनी यासाठी या भूमीवर संस्कार केले आहेत का? जातीपातीचे विष कालावण्यसाठी संस्कार केले का? आज अनेक तरुण देश सोडून बाहेर जात आहेत, शिक्षण, नोकऱ्यांसाठी जात आहेत. कारण सभोवतालचे झालेले जातीपातीचे वातावरण. आपल्याकडचे उद्योगपती देश सोडून जात आहेत. ५ लाख उद्योगपती परिवारासह देश सोडून गेले आहेत. कारण आम्ही एकमेकांकडे जातीपातीने पाहत आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा राहुल गांधी गुळगुळीत मेंदुचे, सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का? राज ठाकरेंचा घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.