Raj Thackeray यांनी आत्मचिंतन करावे; राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

48
Raj Thackeray यांनी आत्मचिंतन करावे; राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला
Raj Thackeray यांनी आत्मचिंतन करावे; राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विधानसभेच्या १२८ जागा लढवूनही शून्य जागा मिळवल्या, तसेच केवळ १.५५ टक्के मते मिळवली. त्यामुळे पक्षचिन्ह रेल्वे इंजिनही जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या ४१ जागांवर प्रश्न विचारण्याऐवजी, मनसे पक्ष आणि कार्यकर्त्यांचे भवितव्य टिकवण्यावर आत्मचिंतन करावे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना परांजपे म्हणाले की, मनसेच्या (MNS) भूमिकेतील सातत्याचा अभाव हा पक्षाच्या अपयशाला कारणीभूत आहे.

(हेही वाचा – विशिष्ट समाजाच्या लांगूलचालनाची उबाठाची भूमिका; Devendra Fadnavis यांची उद्धव ठाकरेंवर टीका)

मनसेची सातत्याने बदलणारी भूमिका

राज ठाकरे (Raj Thackeray) हे मोठे नेते असले तरी त्यांच्या भूमिकेतील गोंधळ महाराष्ट्राने पाहिला आहे. २०१९ मध्ये ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार करत मोदींवर टीका करत होते, तर २०२४ मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा दिला. विधानसभेत महायुतीत सामील होणार की नाही, याबाबतही मनसे संभ्रमात होती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेशी नाळ जोडली आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, असा परांजपे (Anand Paranjpe) यांनी हल्लाबोल केला.

(हेही वाचा – IPL 2025 : राजस्थान रॉयल्सच्या नवीन जर्सीचं राहुल द्रविडच्या हस्ते अनावरण )

मनसेला विधानसभेत स्थानही नाही

मनसेने २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणले होते. मात्र, त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली. २०१४ मध्ये एकच आमदार आला, २०१९ मध्येही तोच आकडा राहिला, आणि आता २०२४ मध्ये मनसेला विधानसभेत प्रतिनिधित्वही नाही. त्यामुळे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असेही परांजपे (Anand Paranjpe) म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास नाही

मनसेच्या (MNS) सातत्याने बदलणाऱ्या भूमिकेमुळे जनतेला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले. ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या पक्षाला जनतेचा पाठिंबा मिळणे कठीण आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी मनसेला लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.