मराठीचा मुद्दा घेऊन राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेने रविवारी पत्रक काढून याबाबतची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे अमित ठाकरेंच्या रूपाने ‘मनसे विद्यार्थी सेने’ला नवे गुरूजी मिळाल्याची चर्चा मनसेप्रेमींमध्ये सुरू आहे.
मनसेने रविवारी पत्रक केली घोषणा
यासंदर्भात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले असून आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. राज ठाकरे यांनी सक्षमपणे या संघटनेचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळे राज ठाकरे ह अल्पावधीत लोकप्रिय झाले होते. आता त्यांचे पूत्र अमित ठाकरे यांनाही हीच किमया साधता येणार का? आता याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
मनापासून अभिनंदन pic.twitter.com/MvsFn3yn2d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 27, 2022
(हेही वाचा – “इतर भाषांना अभिजात दर्जा मिळाला, मात्र मराठीला का नाही?”)
येत्या काळात मनसेला युवकांच्या साथीने मनसे हा पक्ष अधिक मजबूत पक्ष तयार करायचा असल्याचे मनसेने घेतलेल्या निर्णयावरून दिसतेय. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी आग्रही असणाऱ्या मनसेकडून आज मराठी भाषा गौरवदिनाचं निमित्त साधत अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय असून मध्यंतरी त्यांनी नाशिक दौरा देखील केला होता. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची जबाबदारीही अमित ठाकरे यांच्यावर सोपावण्याची शक्यता आहे. तसेच, आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रूपाने अमित ठाकरे यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाल्याने अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेना या पदाची धुरा कशी पेलतात हे पाहणं आता उत्सुकतेचे असणार आहे.
Join Our WhatsApp Community