विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra vidhan sabha election result) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निकालापासून विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी छावा (Chhaava) चित्रपटाबाबत भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा-ऑगस्ट 2024 पासून बंद असलेली India-Israel flight सेवा 2 मार्चपासून पूर्ववत होणार
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “लक्ष्मण उतेकर यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहीजे, मी काही या चित्रपटाचा वितरक नाही. पण छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जीवनाची माहिती देणारा चित्रपट पाहिलाच पाहीजे.” लक्ष्मण उतेकरांच्या भेटीबद्दल बोलताना म्हणाले की, त्यांनी मला सांगितले की, संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले आहे. अर्थात लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. कदाचित इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तरी कधी त्यांनी लेझीम खेळली असेल. पण मी त्यांना म्हटले की, या दृश्यावरून चित्रपट पुढे सरकतोय की फक्त सेलिब्रेशन पुरते गाणे आहे. ते म्हणाले फक्त सेलिब्रेशन पुरते आहे. मग एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावत आहात? अशी सूचना त्यांना दिली. (Raj Thackeray)
हेही वाचा- अंतराळात अडकलेल्या Sunita Williams यांना मस्क परत आणणार; Donald Trump यांनी दिली जबाबदारी
राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणाले, “प्रेक्षक जेव्हा औरंगजेबाने केलेले अत्याचार डोक्यात ठेवून चित्रपट पाहायला जातील, तेव्हा महाराज लेझीम वैगरे खेळताना दिसतील. त्यापेक्षा ते काढून टाका. रिचर्ड एटनबरोने जेव्हा महात्मा गांधींवर चित्रपट केला, तेव्हा महात्मा गांधींनी केलेली आंदोलने आपल्या डोळ्यासमोर होती. कदाचित महात्मा गांधींनी चित्रपटात दांडीया खेळताना दाखविले असते तर.. कदाचित दिग्दर्शकांना तसे दाखवायचेही असेल पण त्यांनी दाखविले नाही.”
हेही वाचा- GBS : आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसची एन्ट्री; सहा रुग्णांना लागण
विधानसभा निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला भेटताय मी तुम्हाला भेटतोय निकाल लागले. निकाल लागल्यानंतर निकालावरची मी प्रतिक्रिया दिली होती. त्याच्यात मी काय बोललो नव्हतो. पण शांत आहे, याचा अर्थ विचार करत नव्हतो असा नाही. सर्व गोष्टींचा विवेचन सुरू होतं आकलन सुरू होतं. बरीच लोक मला भेटली. गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेक लोक भेटायला आली. निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, ज्या प्रकारचा मिरवणुका जल्लोष पाहिजे होता, त्या जागी फक्त राज्यभरात सन्नाटा पसरला होता. हे काय झालं? कसं झालं? असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर बोलले, मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा! कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवरती विश्वासच बसू शकत नाही.”
“मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केले ते आपल्याकडे आले नाही. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर न लढवलेल्या बऱ्या आहेत. ही गोष्ट निघून जाईल, कोणी अमर पट्टा घेऊन आले नाही, मला एक गोष्ट सांगायची आहे की, आजपर्यंत ज्या गोष्टी पक्षाने केल्या, आंदोलन केले. आता पर्यंत कोणकोणते विषय घेतले. हे आपल्याला माहिती हवे. भांभावून जाऊ नका. जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार केलेला असतो. तुम्ही तिथे खचून जाऊ नका, तुम्ही ठाम राहा.” (Raj Thackeray)
“काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 7 वेळ आमदार होते. 70 हजारांचा लीड असायचा आणि यंदा 10 हजारांनी पडले. जे निवडून येऊन सत्तेत बसले आहेत. ते ही बोलत आहे. उद्या लोक म्हणतील राज ठाकरे पराभव झाला म्हणून बोलत आहे. अजित पवार पक्षाच्या 42 जागा आल्या आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केले, त्या शरद पवार यांना 10 जागा जिंकता आल्या. लोकसभेला काँग्रेसने सर्वात जास्त खासदार निवडून आणले. शरद पवार साहेबांचे 8 खासदार असून 10 आमदार निवडून आले. ज्या अजित पवार यांचे 1 खासदार आले त्यांचे 42 आमदार कसे निवडून आले. भाजपला 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो, पण अजित पवार 42 जागा ? 4 ते 5 जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना 42 जागा? आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केल त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. (Raj Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community