“…तर देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा” ; Raj Thackeray काय म्हणाले ?

99
गोंधळलेले Raj Thackeray; महापालिका निवडणुकीआधी मनसेची दिशाहीनता कायम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज ठाकरेंनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. सध्या महाराष्ट्रात सगळेच पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. अशातच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा-EPFO KYC : ईपीएफओसाठीची केवायसी ऑनलाईन कशी करायची?

“निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे. पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकून करा.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

हेही वाचा- औरंगजेबाची फक्त कबर ठेवा आणि तिथे बोर्ड लिहा की…; Raj Thackeray यांनी मांडली स्पष्ट भूमिका

देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाठिंबा देऊ त्यांनी आमचं ऐकावं असं म्हणत त्यांची राजकीय भूमिकाही एक प्रकारे जाहीरच केली. मागच्या वर्षी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. (Raj Thackeray)

लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीबाबत राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीत म्हणाले कर्जमाफी देऊ. काल अजित पवार म्हणाले पैसे भरा. कर्जमाफी होणार नाही. तुम्ही ऐन मोक्यावर म्हणणार पैसे भरा. वारे वा. तसेच लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये करणार? म्हणजे महाराष्ट्रावर वर्षाला ६५ हजार कोटींचे कर्ज होईल. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी सांगितले. राज्यातील प्रश्न सोडवा. रोजगाराचे प्रश्न सोडवा.” असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.