Raj Thackeray : अमित शहांची भेट ते शिवसेनेचा प्रमुख…; राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

289

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतिर्थावर केलेल्या भाषणातून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी अमित शहांच्या भेटीबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. तसेच ‘शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचे असते तर तेव्हाच झालो असतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. मी कोणत्याही शिवसेनेचा पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री होणार नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा Raj Thackeray : …आणि राज ठाकरेंनी त्यावेळेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’मागील कारण स्पष्टच सांगितले)

काय म्हणाले राज ठाकरे? 

  • मला शिवसेनेचा प्रमुख बनायचे असते तर तेव्हाच बनलो असतो, त्याच वेळी माझ्या घरी 32 आमदार आणि 6-7 खासदार जमले होते
  • बाळासाहेब वगळता कुणाच्या हाताखाली काम करणार नाही असे ठरवेल आहे, तरीही (उद्धव ठाकरे) एकाला संधी दिली होती, पण त्याला कळलेच नाही
  • जागावाटपासाठी ९५ नंतर कधीच मी जागा वाटपासाठी बसलो नाही,  इंजिन चिन्हांबाबत तडजोड कधीच करणार नाही
  • दीड वर्षांपासून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आपण एकत्र आले पाहिजे म्हणून अमित शाह यांना दिल्लीत जावून भेटलो
  • शिवसेनेनंतर माझे चांगले संबंध भाजपासोबत, काँग्रेसशी भेटी होत्या पण गाठी पडल्या
  • भाजपसोबत माझा राग टोकाचा होता, चंगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणारच, माझा विरोध उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यासारखा नाही
  • त्यांचा पक्ष फुटल्यानंतर आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांनी विरोध सुरू केला
  •  जगात सगळ्यात तरुण देश भारत आहे, शिक्षण, तंत्रज्ञान आणि नोकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्याने काम करावे
  • जपानप्रमाणे भारत देश घुसळून निघाला पाहिजे, नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही तर देशात अराजकता माजेल
  • महाराष्ट्रातून जेवढा कर देशाला जातो त्याचा मोठा वाट राज्याला मिळायला हवा
  • मतदारांनी व्याभिचाराला राजमान्यता देऊ नये, पुढचे दिवस भीषण आहेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा, मनसैनिकांनो विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.