पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रमुख उपस्थिती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सांगता सभा पार पडली. हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तर, असदुद्दीन औवेसीचं (Asaduddin owaisee) नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी महत्वाची मागणी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. देशभक्त मुस्लिमांना सुरक्षित वावरण्यासाठी हे करा, असेही राज ठाकरेंनी म्हटले. (Raj Thackeray)
डोकं वर काढण्यासाठी त्यांना काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणातून देशातील मुस्लीम बांधवांवरही भाष्य केलं. या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या देशात लाखो, करोडो देशभक्त मुस्लीम आहेत. या देशावर ते प्रेम करतात. त्यांचा या देशावर निष्ठा आहे. पण, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत ना, त्यांचा उद्देश केवळ 10 वर्षात त्यांना डोकं वरती काढता आलं नाही. डोकं वर काढण्यासाठी त्यांना काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही, म्हणून ते आज सगळ्यांना पाठिंबा देत आहेत. लाखोंच्या संख्येने, करोडोंच्या संख्येने मुस्लीम आपल्यासोबत आहेत, त्यांना सुरक्षा हवी आहे. त्यांना आदर हवा आहे, त्यांना देशामध्ये काम करायचं आहे. तो पिढ्या न पिढ्या येथे राहणारा आहे. पण हे मुठभर आहेत. ओवैसींसारख्या ज्या औलादी आहेत, त्यांचे जे अड्डे आहेत, ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल.” अशा शब्दात राज ठाकरेंनी आपली अपेक्षा व्यक्त केली. (Raj Thackeray)
(हेही वाचा –राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल…; PM Modi यांचे शरद पवारांना आव्हान)
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राम मंदिर व कलम 370 च्या मुद्द्यावरुन मोदींचे कौतुक केले. मोदींना मी खरोखर धन्यवाद देतो, आपण होतात म्हणूनच ते राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं. नरेंद्र मोदींनी एक गोष्ट करुन दाखवली ती म्हणजे ट्रीपल तलाक, तलाक.. तलाक.. तलाक… म्हणून मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्यावर मोदींनी ही गोष्ट करुन सर्वात धाडसी काम केलंय. असं मला वाटतं, असे म्हणत राज ठाकरेंनी ट्रीपल तलाक कायद्याचे स्वागत केले. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community