सध्या राज्यात ईडीचे छापे पडत आहेत, त्यात राष्ट्रवादीचे एकामागोमाग एक नेते अडकत आहेत. त्यामागे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात आहे का, असा धक्कादायक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली, त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभा घेऊन टीकाकारांची सडेतोड भाषेत हजेरी घेतली.
(हेही वाचा शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप)
अजित पवारांच्या घरी छापा पडतो तरी शरद पवारांचे मोदींशी संबंध मधुर कसे?
सुप्रिया सुळे बोलतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीस नंतर बदलतात. मला आश्चर्य वाटते, एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरात रेड पडते, पण सुप्रिया सुळे तुमच्या घरी रेड पडत नाही, याचे कारण कळेल का? इकडे महाराष्ट्रात सुरु आहे, एकेक जण पोहचवला कि पवार साहेब मोदींची भेट घेतात, दुसरा माणूस सांगायला, देशमुख गेले, परत एक भेट घेतली, अजितचे काय? मग रेड टाकल्या. रेड टाकून झाल्यावर परत एक भेट घेतली, तो नवाब मलिक फाजीलपणा जास्त करत आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्या. मग नवाब मलिक. नंतर सगळ्या खासदारांसोबत फोटो काढला आणि परत हळूच आतमध्ये जाऊन भेटले, मग कोण संजय राऊत, असे म्हणे! आता काय बोलले माहित नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की, पवार साहेब खुश झाले की, त्यांची भीती वाटायला लागते. आज पवार साहेब खुश आहेत, संजय राऊतवर खुश आहेत, कधी टांगलेले दिसेल कळणारही नाही. याचातच अनेक काँग्रेसवाले गेले आहेत. उशिरा कळते. तेव्हा ते बोलले होते, आज ते कळले. अजित पवारांच्या घरात रेड पडते, अजित पवारांच्या सख्खा बहिणीच्या घरी रेड पडते, त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधुर संबंध राहतात, कसे काय? मी कधी बघितले नाही शरद पवारांना उघडपणे बोलताना, मी हेच बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या, असे महाराष्ट्राला हादरवून टाकणारे प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
(हेही वाचा ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)
Join Our WhatsApp Community