पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अयोध्येत राम मंदिर उभे राहू शकले. त्यांच्या काळात सीएए, कलम ३७० मागे हटवण्यात आले. त्यांनी अनेक खंबीर निर्णय गेल्या पाच वर्षात घेतले असल्याने त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. शनिवारी, (१३ एप्रिल) त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. (Raj Thackeray Press Conference)
दरम्यान, महायुतीचा प्रचार करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधावा याची यादी देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मनसेच्या नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
(हेही वाचा – IPL 2024, Virat Gesture : हार्दिक ट्रोल होताना विराटने केलेल्या मदतीचं होतंय कौतुक)
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त सभा घेत महायुतीला पाठींबा जाहीर केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील काही जण नाराज होते. दरम्यान, त्यांनी हा निर्णय का घेतला तसेच लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठक बोलावली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. मोदी यांना पाठिंबा का दिला? याची माहिती देत निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं…
मोदी यांना का पाठिंबा दिला या बाबत बोलतांना राज ठाकरे म्हणाले. मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात राम मंदिराचा उल्लेख करावा लागेल. कोर्टाने निकाल दिला असला, तरी एवढ्या कमी कालावधीत हे मंदिर मोदी यांच्यामुळेच उभे राहू शकते. त्यांनी याबाबत घेतलेले योग्य निर्णय त्यामुळे हे शक्य झाले. त्यांच्या काळात सीसीए, नोटबंदी व कलम ३७० हटवल्या गेल्याने आज देशात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. ते खंबीरपणे निर्णय घेत असल्याने त्यांना पाठिंबा दिला. मात्र, पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना हे निर्णय समजत नाही ते त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत, असे पक्षातील राजीनामा देणाऱ्यांवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले.
प्रचारासाठी मनसे नेत्यांची यादी दोन दिवसांत तयार करणार (Lok Sabha Election 2024)
प्रचारासाठी मनसे नेत्यांची यादी येत्या दोन दिवसांत तयार करणार असल्याचेदेखील राज ठाकरे म्हणाले. भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांना सन्मानाने वागवतील, अशी अपेक्षा आहे. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना महायुतीला पूर्णपणे सहकार्य करण्याचे सांगितले आहे. केवळ या नेत्यांशीच संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला जावा, असे ठाकरे म्हणाले. जे काही निर्णय होतील, त्यात या नेत्यांना सहभागी करून त्यांचीदेखील मते जाणून घेऊन निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे म्हणाले.
राज्यातील अनेक विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा
पंतप्रधान मोदी यांच्या सोबत राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे ठाकरे म्हणाले. यात गड किल्ल्यांचे संवर्धन, राज्यात उद्योगांना प्राधान्य, यासारखे अनेक विषय आहेत. या भूमिकेतून त्यांनी इतर राज्यांचादेखील विकास करावा, असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community