आडनावे कशी पडली, याची मला कायम उत्सुकता असते, त्या उत्सुकतेपोटी आपण आडनावांचा इतिहास शोधत असतो, उदाहरणार्थ फडणवीस हे मूळचे पर्शियन नाव ‘फर्द नलीस’ असे आहे. ‘फर्द’ म्हणजे कागद, ‘नलीस’ म्हणजे लिहिणारा. म्हणजे ‘फर्द नलीस’. नंतर ते फडावर लिहिणे आले. म्हणून ते फडणवीस आले, असे मनसे अध्यक्ष राजा ठाकरे म्हणाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी पुणे येथील कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर राज यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्याकडे अनेक शब्द आहेत ते फारसी आहेत. पण ते आपल्याला माहीत नसतात. आडनावे कशी असतात? आडनाव कशी पडली? ती कुठून आली? यात आपल्याला रस आहे. हे कुठून आले? कसे आले? महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता. मग गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. बाबासाहेब या विषयावर माझ्याशी बोलले त्याबद्दल मी मला भाग्यवंत समजतो, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा : सत्ताधाऱ्यांना खुर्ची बोचायला लागली! फडणवीसांनी सांगितले सरकारचे भवितव्य)
शंभराव्या वर्षीही बाबासाहेबांचे तेज कायम!
आपल्याला छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवे बाबासाहेबांकडून आपल्याला ऐकायला मिळाले. मी लहानपणापासून त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. शिवछत्रपतींचे चरित्र अनेकदा वाचून झाले आहे. मी ज्यावेळी त्यांचे व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटते ते नुसते शिवचरित्र सांगत नाहीत. आजही वयाच्या शंभराव्या वर्षी बाबासाहेब पुरंदरे यांच्या चेहऱ्यावर तेज कायम आहे. स्मरण शक्ती उत्तम आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community