कॉँग्रेससोबत आघाडी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या उबाठाने स्वाभिमानी बाणा सोडून आपापसात वाद लावण्याचे राजकारण सुरू केल्याचे दिसून येते. उबाठा गटाने आता ‘मराठा विरुद्ध मनसे’ असा वाद पेटवण्याचे षडयंत्र रचल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Raj Thackeray Visit)
मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांचा मनसे पक्षावर सुपरीबाज असा आरोप नेहमी केला जातो. शुक्रवारी ९ ऑगस्ट २०२४ ला बीड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उबाठा कार्यकर्त्यांनी सुपऱ्या फेकून निषेध व्यक्त केला. त्यांनंतर मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. (Raj Thackeray Visit)
(हेही वाचा- Raj Thackeray Visit : मनसेच्या इशाऱ्याला उबाठा गट घाबरला; आंदोलन करून ‘हात’ झटकले)
‘फेक नरेटीव्ह’
पण उबाठाने या आंदोलनात उबाठाचा सहभाग नसल्याचे जाहीर करत आंदोलक सर्वपक्षीय मराठा समाजाचे होते आणि त्यात मनसेचे कार्यकर्तेसुद्धा होते, असा अजब दावा केला. राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे विधान केल्याचे ‘फेक नरेटीव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करून मराठा समाजाला मनसेविरुद्ध भडकवण्याचे षडयंत्र रचल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविक राज ठाकरे यांनी राज्यात मुंबई, ठाण्यासाह काही ठिकाणी इतका विकास झाला आहे की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे मत व्यक्त केले होते. याचा विपर्यास राऊत यांनी केला. (Raj Thackeray Visit)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community