चिपळूण येथील १४० कोटी रुपयांचा फ्लायओव्हर पडला. आमच्याकडे एक दिवसाची बातमी होते त्यापुढे काही होत नाही. संबंधित मंत्र्यांचा कोणी राजीनामा देखील मागत नाही. रविंद्र चव्हाण म्हणाले होते गणपतीसाठी एक लाईन सुरु करतो. जे करोडो रुपये घातले ते सगळे वाहून गेले, सगळं वाया गेलं. करोडो रुपये फुकट जातात तरी या देशात मतदान होतात निवडणुका होतात, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई, ठाणे आणि कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात राज ठाकरे बोलत होते. (Raj Thackeray)
महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आहे तोच विरोधात आहे, अशी घाणेरडी परिस्थिती राज्यात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जगाच्या पाठीवर अशी स्थिती फक्त महाराष्ट्रात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. चिपळूण येथील फ्लायओव्हर पडल्याच्या घटनेवरुन देखील राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.तर टोल नाक्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, ९० कॅमेरे प्रत्येक टोलनाक्यावर लागले. किती गाड्या येतात किती जातात हे कळतच नाही. रोज किती गाड्या रजिस्टर होत आहेत. ठाणे, मुंबई आरटीओमध्ये हजार गाड्या रजिस्टर होतात आणि टोलवर गाड्या तेवढ्याच, असं कसं होईल?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray)
(हेही वाचा : Auto Drivers : आरटीओकडून १,५०० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, ६६६ वाहन परवाने निलंबित)
राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात सगळी विचित्र परिस्थिती झाली आहे. एवढी विचित्र परिस्थिती मी बघितली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्यात असेल एक पक्ष आहे ज्यातील अर्धा पक्ष सत्तेत तर अर्धा पक्ष बाहेर आहे. सत्तेत शिवसेना बाहेर शिवसेना, सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी, अशी परिस्थिती जगात कधी बघितली का?, याला राज्य म्हणायचं का? असाही संतप्त सवाल ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
“कायदा नावाची गोष्टच उरली नाही. भीती नावाची गोष्टच उरली नाही. रस्त्यावर खड्डे पडत आहेत, खड्ड्यांवरून गाड्या जात आहेत, पण राग येत नाही कोणाला. आत जे धुमसत आहेत ते एकदिवस बाहेर काढेन. इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले यांना त्या गोष्टीचे तर पाहा. तुर्तास या निवडणुकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे”, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community