मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतल्याने सगळ्या मराठी न्यूज चॅनेलवर सोमवारी सकाळी ठाकरेच दिसले. उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांची तीच सकाळची वेळ ठाकरे यांनी खाल्ली. आणि त्यानंतर राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना निवडणुकीतील ‘मॅचफिक्सर’ असे संबोधले, तर राज यांनी राऊत यांना उत्तरातून एक गर्भित इशाराच दिला आहे.
राऊतांचे राजना टोमणे
राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या सोलापूर दौऱ्यावर असून सोमवारी 5 ऑगस्टला सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राऊत यांचीही दैनंदिन पत्रकार परिषद सुरू झाली. राऊत यांना राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न केला असता राऊत यांनी राज आणि त्यांच्या पक्षाला टोमणे मारले.
(हेही वाचा – Coastal Road Project ला विलंब करणाऱ्या कंत्राटदाराला फक्त 35 कोटींचा दंड)
दरवर्षी नव्याने राजकारण
विविध विषयांवर बोलताना पत्रकारांनी राज ठाकरेंवर विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारले असता, “राजकारणात त्यांनी नव्याने सुरुवात केली आहे. ते प्रत्येकवर्षी राजकारणाची नव्याने सुरुवात करतात. पण गल्ली क्रिकेटपासून ते टेस्ट क्रिकेटपर्यंत त्यांना कधीच यश मिळाले नाही. त्यांचे संपूर्ण राजकारण मॅचफिक्सिंगवरच असते,” असा टोमणा मारला. (Raj Thackeray)
कायम लक्षात राहील
राऊत यांच्या या टोमण्याबद्दल राज यांना सोलापुरात विचारले असता राज म्हणाले, “बोलेन पण योग्य वेळी.” तसेच “मी जेव्हा बोलेन तेव्हा ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहील,” असा गर्भित इशाराच राज यांनी राऊत यांना दिला.यामुळे येत्या विधानसभा निवडणूक प्रचारात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच मनसे, वंचित आघाडी आणि झाली तर तिसरी आघाडी असा चौफेर प्रचार होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community