राज ठाकरे अटकेला सामोरे जाणार! मनसेची भूमिका स्पष्ट

141
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेतील भाषणामुळे वादात सापडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता राज ठाकरे यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील कलम १५३ अ अंतर्गत राज ठाकरे यांना अटक होण्याची दाट  शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान पोलीस जर राज ठाकरे यांना अटक करण्यासाठी आले, तर राज ठाकरे त्यांना अटकेसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहेत, यापूर्वीही त्यांनी अटकेसाठी सहकार्य केले होते, असे मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

मनसे काढणार पत्रक 

राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे मंगळवारी, ३ मे २०२२ रोजी माध्यमांनी एकच गर्दी केली होती. संध्याकाळी किल्लेदार शिवतीर्थ बंगल्यातून बाहेर पडले, तेव्हा माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पोलिसांनी नोटीस दिली आहे, वकिलांचे सल्ले घेत आहोत. या प्रकरणामुळे शिवतीर्थमध्ये कोणताही तणाव नाही, सगळे मजामस्ती करत आहेत. पोलिसांनी १५ हजार कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस स्वीकारल्या म्हणजे काहीच करणार नाही. राज ठाकरे यांना अटक केल्यावर मनसे कार्यकर्ते यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे आम्ही आता काही सांगत नाहीत. मनसेची ४ मे पासून काय भूमिका असणार यावर मनसे पत्रक काढणार आहे, असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.