लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार की युती करुन?, राज ठाकरे म्हणाले…

209
Raj Thackeray : मला आपल्याशी बोलायचं आहे : राज ठाकरे यांची मनसैनिकांना साद

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (१३ जुलै) राज ठाकरेंनी चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शुक्रवारी (१४ जुलै) दापोलीतून माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक असते. या निवडणुकीत एकच भूमिका असते. एका जिल्ह्यासाठी एक आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसरी असं काही नसतं.” असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

सध्या राजकारणात जे काही सुरु आहे, त्यामुळे मी कोणाबरोबर जाईन असे मला वाटत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचेही मनसेने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला फ्रान्सचा ‘हा’ सर्वोच्च सन्मान, ठरले पहिले भारतीय पंतप्रधान)

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की, “कुणाच्या हातात काय राहिले? मला कळतच नाही. हम करे सो कायदा सुरू आहे. अजूनही निवडणुका होत नाहीत. दोन दोन-तीन तीन वर्ष निवडणुका प्रलंबित आहेत. हे गंभीर आहे. त्यावर कोणी बोलत नाही. चालढकल सुरू आहे. येत्या १० ते १५ दिवसांत मी मेळावा घेणार आहे. यावेळी मी जे काय आहे ते स्पष्ट सांगणार आहे,” राज ठाकरे यांनी आपण स्वबळावरच लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.