राज ठाकरे रोज ऐकणार मोदींच्या घोषणा ; भाजपने राज ठाकरेंना दिली अनोखी भेट

99

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार आहे. त्याचे असे झाले की, राज ठाकरे यांना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक विशेष गिफ्ट दिले आहे. या भेटवस्तूमध्ये नरेंद्र मोदींच्या घोषणा ऐकू येतात. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर मोदींचा आवाज घुमणार आहे.

तसेच, चंद्रपूरच्या एका शालेय विद्यार्थीनीने राज ठाकरे यांचे एक पोट्रेट तयार केले असून, त्यांना ते पोट्रेट देण्यासाठी विद्यार्थीनी हाॅटेलबाहेर थांबली. रोहिणी वायकोर असे या मुलीचे नाव असून ती चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक विद्यालयात 9 वीच्या वर्गात शिकते. राज ठाकरे हे अतिशय आवडते व्यक्ती असल्याने, त्यांचे पोट्रेट तयार केले असल्याचे तिने सांगितले.

( हेही वाचा: “शिल्लक सेनेच्या ‘टोमणे’ मेळाव्याला मुंबई मनपाने परवानगी द्यावी,महाराष्ट्राला मनोरंजनापासून वंचित ठेवू नये” )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.