आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून, येत्या काही दिवसातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. दरम्यान, प्रचारभांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. अशातच रविवारी शिवसेना पक्षाचा मेळावा आझाद मैदान परिसरात पार पडला. तर शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी महाराज पार्क येथे पार पडला. दरम्यान, मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा १३ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर केली आहे. (Raj Thackeray)
आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “आगामी निवडुकीसाठी ना यु्त्या, ना आघाड्या… आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार” आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल. ज्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या लोकांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू… जगाला हेवा वाटवा असा महाराष्ट्र घडावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने आमच्या हातात द्यावी. (Raj Thackeray) असे विधान राज ठाकरे यांनी केले.
(हेही वाचा – “…तर महाराष्ट्र बरबाद होणार”, Raj Thackeray यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांसह ठाकरेंना सुनावलं)
सत्ता मिळाली तर महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. सत्तेतील आणि विरोधातील लोक निवडणुकीसाठी काहीही करतील. उद्या जेव्हा हे राजकीय पक्ष पैसे वाटतील तेव्हा ते नक्की घ्या कारण तुमचे पैसे आहेत आणि मतदान मनसेच्या (mns) उमेदवाराला करा. एकदा मला महाराष्ट्र देऊन बघा मग महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community