चिंचवडमध्ये मनसेचा (MNS) वर्धापन दिन साजरा होत आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संवाद साधला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. इथून पुढे पक्षातील प्रत्येकाचं काम तपासलं जाणार. पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. आपल्याला राजकीय फेरीवाले उभे करायचे नाही. कामात दिरंगाई आढळल्यास पदावरून काढणार. अशा कडक शब्दात राज ठाकरेंनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी तंबी दिली आहे. (Raj Thackeray)
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी आज फार काही बोलणार नाही. २० दिवसांवर गुढीपाडव्याचा मेळावा आहे. मी तिकडे दांडपट्टा फिरवणार आहे तर मग चाकू आणि सुरे कशाला काढू? सदानंद मोरेंनी आजच्या परिस्थितीवर बोलावं ही माझी अपेक्षा होती. राजकारणाचा चिखल झाला आहे. मतं मिळवण्यासाठी डोकी फोडून घेत आहेत, आगी लावत आहेत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही.” (Raj Thackeray)
हेही वाचा-Thane परिवहन सेवेतील महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या कार्याचा दिल्लीत सन्मान
“एक छोटीशी गोष्ट सांगतो, प्रभू रामचंद्रांचा जेव्हा वनवास झाला तेव्हा ते निघाले, त्यांच्याबरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन गेला. नाशिकमध्ये आले. १४ वर्षांचा ववनास त्यांनी भोगला. मध्यंतरीच्या काळात रामचंद्रांच्या सीतेला पळवून घेऊन गेला. मग वाली आणि सुग्रीव भेटले. वालीचा वध केला. त्यानंतर वानरसेना बरोबर घेतली. सेतू बांधला श्रीलंकेत गेले, तिथे रावणाचा वध केला. या सगळ्या गोष्टी १४ वर्षात त्यांनी केल्या. आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधायला १४ वर्षे घेतली आहेत.” (Raj Thackeray)
“जी काही कामं सुरु आहेत ना त्याबद्दल मी सविस्तर गुढीपाडव्याला बोलणार आहेच. मग जातीपातीचे विषय, सोशल मीडियावर टाळकी भडकवणं हे जाणूनबुजून उद्योग सुरु आहेत. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना? तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही. ” असा टोला राज ठाकरेंनी लगावला. (Raj Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community