राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेवर आदित्य ठाकरेंची मिश्किल टिप्पणी, म्हणाले…!

121

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून केलेल्या सभेतून आणि त्यानंतर ठाणे येथील उत्तरसभेमधून मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या. ५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलेले आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या या औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात टोला लगावला आहे.

औरंगाबादेत पर्यटन वाढतेय

मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत, असे सांगत यावर माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा आदित्य ठाकरे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा आदित्य यांनी तिथे आम्ही पर्यटन वाढवतोय, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत यावर टोला लगावला. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्येही हशा पिकला होता. मुंबईत गिरगाव चौपाटी येथील व्ह्युविंग डेकच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना विविध मुद्यावर प्रश्न विचारले, तेव्हा ते बोलत होते.

(हेही वाचा उरले फक्त ५ दिवस, तरी ३५ हजार एसटी कामगार गैरहजर)

धर्म मनात असतो 

आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत जो संघर्ष होता तो न्यायालयाने संपवलेला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे अयोध्येत मंदिर बनत आहे. ज्यावेळी संघर्ष सुरू होता तेव्हा आम्ही गेलो, त्यावेळी आम्ही सांगितले की, पहिले मंदिर फिर सरकार, तसे ते काम सुरू झाले आणि आता आम्ही चाललो ते दर्शनासाठी चाललो, आमची स्वत:ची जिथे श्रद्धा आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यामध्ये कुठेही राजकीय हेतू नाही. धर्म हा आपल्या मनात असतो. आपण मंदिरात जात असतो, काल मी देखील हनुमान चालीसा पठण केले. तसेच, निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रचार करत असतो परंतु त्यानंतर मधला जो काळ असतो, त्यात कामे करायची असतात. जी कामे आम्ही करत असतो त्याची भूमिपुजन, उद्घाटन आम्ही हाती घेत असतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.