राज ठाकरेंची ‘या’ तारखेला होणार ‘उत्तरसभा’

137
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेला ९ एप्रिल रोजीची तारीख रद्द झाली आहे. आता ती सभा १२ एप्रिल रोजी होणार आहे. या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे.
९ एप्रिल रोजी ठाण्यात मोकळ्या जागेवर राज ठाकरे यांच्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकरली होती. रस्त्यावर वाहतूक समस्या निर्माण होण्याचे कारण देण्यात आले होते. शिवाय इतर कोणत्याही सभागृहात सभा घेण्याची सूचना पोलिसांकडून मनसेला करण्यात आली होती. परंतु परवानगी नाकारल्यानंतरही गडकरी रंगायतन बाहेर सभा घेण्यावर मनसे ठाम होती. त्यामुळे आता ही सभा ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.

ठाण्यात एकही मैदान नाही 

आम्ही पहिल्यांदा गुढीपाडव्याला जी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. त्यानंतर ९ एप्रिल रोजी ठाण्यात उत्तर सभा होणार, असे आम्ही जाहीर केले होते. त्याची संपूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. आज पोलिसांच्या परवानगीसाठी आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि मी असे सकाळी परवानगीसाठी पोलीस आयुक्तांकडे गेलो. त्यांनी पहिल्यांदा सांगितले की, सभा रस्त्यावर करू नका, मैदानात करा. पण दुर्दैवाने ठाणे शहरात असे एकही मैदान नाही, की राज ठाकरे यांची सभा तिकडे होऊ शकेल. म्हणून आता खरोखरच कुठलाही पर्याय ठाण्यामध्ये नसल्यामुळे आम्ही मागील वेळी गडकरी रंगायतनच्या बाहेर जी सभा घेतलेली, तशाच प्रकारची सभा गडकरी रंगायतनच्या दुसऱ्या रस्त्यावर घ्यायची असे निवेदन दिले होते, परंतु पोलिसांकडून परवानगी देण्यास विलंब होत होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.