‘मराठी भाषेचा अवमान केलात तर कानाखाली बसेल’; Raj Thackeray यांचा इशारा

68

Raj Thackeray – महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला संकटाचा विळखा पडतो आहे. मराठी भाषेचा अवमान सहन केला जाणार नाही. प्रत्येक राज्यात त्या राज्याच्या राजभाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यामुळे मराठी (Marathi) म्हणून कडवटपणे उभे राहण्याची गरज आहे. जोपर्यंत आपल्यावर कोणी येत नाही तोपर्यंत आपण मराठी म्हणून उभे राहू, पण जर कोणी अंगावर आला तर हिंदू (Hindu) म्हणून त्याला प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा कानमंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना दिला. (Raj Thackeray)

गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा बुलंद नारा
गुढीपाडवा (mns gudi padwa melava 2025) निमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मनसेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. “मराठीचा अवमान कोणी करणार असेल तर कानफटीतच बसेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच, महाराष्ट्रातील सर्व बँका आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत आहे का, यावर नजर ठेवण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

(हेही वाचा – औरंगजेबाची फक्त कबर ठेवा आणि तिथे बोर्ड लिहा की…; Raj Thackeray यांनी मांडली स्पष्ट भूमिका)

‘चित्रपट पाहून जागा होणारा हिंदू उपयोगाचा नाही’
राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून काहींवर टीका करताना सांगितले की, “आता कुठून औरंगजेबाच्या कबरीची आठवण झाली? चित्रपट पाहून जागा होणारा हिंदू काही कामाचा नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आता लोकांना कळतेय. पण औरंगजेब हा विचार संपवण्यासाठीच मराठ्यांनी त्याला नामोहरम केले होते. आपण पुढच्या पिढ्यांना योग्य इतिहास सांगण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवरचा इतिहास वाचून भडकत आहोत.”

नद्या आणि जंगलांच्या संवर्धनावर भर
धर्माच्या नावाखाली नद्यांचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे, असे सांगताना राज ठाकरे म्हणाले, “गंगाशुद्धीकरणासाठी ३३ हजार कोटी रुपये खर्च झाले, पण नदी आजही स्वच्छ नाही. हिंदूंच्या अंत्यसंस्कारासाठी विद्युतदाहिनीचा पर्याय स्वीकारला पाहिजे, म्हणजे लाकडाचा अनावश्यक वापर थांबेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जंगलं आणि प्राणी आवडतात, मग त्यांनी जंगलांचं संरक्षण करायला हवं.”

‘बीडमध्ये जातीयवाद नव्हे, तर गुंडगिरीचा प्रश्न’
बीड येथे झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “हा मुद्दा केवळ खंडणी आणि पैशांचा आहे, पण त्याला वंजारी-मराठा वादाचं रूप देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, रोजगार मिळत नाही, पण लोकांना जातीपातीत गुंतवून ठेवले जात आहे.”

(हेही वाचा – Raj Thackeray यांच्या निशाण्यावर BJP आणि आशिष शेलार?)

‘लाडकी बहिण योजना बंद होणार’
सरकारच्या लोकलुभावन योजनांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “लाडकी बहिण योजनेसाठी राज्य सरकारवर ६३ हजार कोटींचे कर्ज होणार आहे. ही योजना किती दिवस टिकणार? त्यापेक्षा युवकांना रोजगार द्या. पण सरकार जनतेला जाती-पातीत अडकवून ठेवत आहे.”

‘योगींनी लाउडस्पीकर बंद केले, महाराष्ट्रात काय?’
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले, “मी लाउडस्पीकर बंद करण्याची मागणी केली होती, तेव्हा माझ्या १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आता मुख्यमंत्री म्हणतात की रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतील, पण ते तर आधीपासूनच बंद असतात. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पाऊल उचलत लाउडस्पीकर बंद केले, मग महाराष्ट्रात का नाही?”

(हेही वाचा – Myanmar च्या भूकंपातून ३३४ अणुबॉम्ब इतक्या ऊर्जेची निर्मिती; तज्ज्ञांनी दिला आफ्टरशॉकचा इशारा)

‘मुख्यमंत्री फडणवीस यांना समर्थन, पण योग्य निर्णय घेतले तरच!’
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना अटीवर पाठिंबा दर्शवला. “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्रासारखे सुसंस्कृत राज्य आहे. जर त्यांनी मराठी माणसाच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले, तर त्यांना आमचा पाठिंबा असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.