नालासोपारामध्ये चार नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार करा; आमदार Rajan Naik यांची मागणी

30
नालासोपारामध्ये चार नवीन रेल्वे उड्डाणपुल तयार करा; आमदार Rajan Naik यांची मागणी
नालासोपारामध्ये चार नवीन रेल्वे उड्डाणपुल तयार करा; आमदार Rajan Naik यांची मागणी

वसई-विरार शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून चार नवीन रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नालासोपारा (Nala Sopara) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक (Rajan Naik) यांनी विधानसभेत केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा त्यांनी मांडला. वाढती वाहतूक कोंडी ही नालासोपारा शहराची मोठी समस्या आहे. त्यामुळे पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये नाईक (Rajan Naik) यांनी नागरिकांच्या प्रश्नांना हात घालत शासनाचे लक्ष वेधले आहे.

( हेही वाचा : इस्कॉनचे Chinmoy Krishna Das यांच्या वकीलाचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, अंतरिम सरकार आणि धर्मांधांनी…

वसई-विरार महानगरपालिकेची (Vasai Virar Municipal Corporation) स्थापना २००९ साली झाली. त्यावेळी महापालिकेने १२ लाख लोकसंख्येसाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले होते. मात्र, सध्याची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक आहे. यामुळे सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीसोबत मालवाहतुकीतही प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, रेल्वे उड्डाणपुलांवर अधिक ताण पडत असून, अपुरी पायाभूत सुविधा ही नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. (Rajan Naik)

यामुळेच विरार-विराट नगर, नालासोपारा येथील ओसवाल नगरी, अलकापुरी, आणि वसई येथील उमेळमान अशा प्रमुख ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी आवश्यक असून ही कामे लांबणीवर पडल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे सांगत नाईक (Rajan Naik) यांनी चार नवीन रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली.

दरम्यान वसई-विरारमधील उड्डाणपुलांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी आमदार नाईक यांनी विधीमंडळात केली. या प्रकल्पांमध्ये विरार-विराट नगर, ओसवाल नगरी, अलकापुरी, आणि उमेळमान या चार ठिकाणी उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामुळे लवकर वसई विरार शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. त्यामुळे नाईक यांच्या मागणीला वसई-विरारमधील नागरिकही पाठिंबा देत आहेत आणि लवकरच प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. (Rajan Naik)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.