गहलोत-पायलट यांचे मनोमिलन; विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

188
गहलोत-पायलट यांचे मनोमिलन; विधानसभा निवडणूक एकत्र लढणार
गहलोत-पायलट यांचे मनोमिलन; विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

राजस्थान काँग्रेसमधील वाद जवळपास मिटला आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील बंगल्यावर राहुल गांधींसोबत चार तास बैठक केली. या दोन्ही नेत्यांनी पुढील विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते. वेणुगोपाल यांनी सामंजस्याचा दावा केला आहे, मात्र अद्याप सचिन पायलट यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हे विशेष. आता पायलट यांच्या वक्तव्याची प्रतीक्षा आहे. पायलट यांच्या तीनही मागण्या आणि राजकीय मुद्द्यांवर काँग्रेस अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. सामंजस्याचे सूत्र उघड न करून केवळ हायकमांडवर निर्णय सोडल्याचे सांगितले आहे.

पायलट यांचा अल्टिमेटम संपण्यापूर्वी समेट घडविला गेला. पायलट यांचा अल्टिमेटम ३० मे रोजी संपत आहे. याच्या काही तासांपूर्वीच त्यांचा प्रश्न सुटला आहे. पायलट यांनी अल्टिमेटमवर अद्याप काहीही सांगितलेले नाही. तीन मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. सामंजस्यानंतर पायलट यापुढे आंदोलन करणार असल्याचे मानले जात आहे.

बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, ‘यावर्षी होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुका दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील. दोघांमध्ये अजून चर्चेचा टप्पा बाकी आहे.’

(हेही वाचा – मोदी सरकारच्या ९व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना; विनोद तावडेंची माहिती)

मॅरेथॉन बैठकीत पायलट यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला ठरवण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पायलट यांचा अल्टिमेटम ३० मे रोजी संपत होता. त्यामुळे हायकमांडने या समस्येवर निर्णायक तोडगा काढला असावा. केसी वेणुगोपाल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासोबत ४ तास बैठक झाली. गेहलोत आणि पायलट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गेहलोत आणि पायलट दोघांनीही निर्णय हायकमांडवर सोडला आहे.

खरगे यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर गेहलोत आणि पायलट केसी वेणुगोपाल यांच्यासोबत बाहेर आले. गहलोत आणि पायलट दोघेही हसत होते. वेणुगोपाल यांनी केवळ माध्यमांशी संवाद साधला. गहलोत आणि पायलट फक्त हसत राहिले, काहीच बोलले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.