काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत गहलोत यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वादळ पेटले आहे. या निवडणुकीसाठी महत्वाचं नाव समजले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी मोठी घेषणा केली आहे. आपण काँग्रेसच्या अध्यक्षपादाची निवडणूक लढवणार नसल्याचे गहलोत यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचावर अखेर पडदा पडला आहे.

अशोक गहलोत यांची घोषणा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची अशोक गहलोत यांनी गुरुवारी भेट घेतली. तब्बल दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर गहलोत यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. मी माझे सगळे मुद्दे सोनिया गांधी यांच्यापुढे ठेवले असून मला राजस्थानचे मुख्यमंत्री रहायचे असल्याचे त्यांना सांगितले असल्याचे गहलोत यांनी यावेळी स्पष्ट केले.

(हेही वाचाः ‘सध्या मी बेरोजगार आहे त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या विधानाची चर्चा)

म्हणून निर्णयात बदल

मी कोची येथे राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी ती विनंती अमान्य केल्यावर मी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली होती. पण आता राजस्थानमधील राजकीय अस्थिरता पाहून मी माझा हा निर्णय बदलत असल्याचे अशोक गहलोत यांनी सांगितले आहे.

राजस्थानमध्ये राजकीय वादळ

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार होते. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे नाव नवे मुख्यमंत्री म्हणून समोर येऊ लागले होते. पण गहलोत समर्थकांचा पायलट यांना विरोध असल्यामुळे राजस्थानमधील तब्बल 92 आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे राजस्थानमध्ये मोठे राजकीय वादळ उठले होते.

(हेही वाचाः ‘काही माणसं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबत’, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव अढळरावांना टोला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here