राजस्थानमध्ये काँग्रेसच्या तब्बल 92 आमदारांनी दिले राजीनामे; पायलट यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध

सध्या राजस्थानच्या राजकारणात वेगवाग घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री पदासाठी सचिन पायलट यांचे नाव सर्वात पुढे आहे. परंतु गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध आहे. त्यामुळे तब्बल 92 आमदारांनी एकाचवेळी राजीनामे दिले आहेत.

बैठक रद्द

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे काॅंग्रेसने ही बैठक रद्द केली. गेहलोत समर्थक 92 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे सोपवला आहे.

( हेही वाचा: बाळासाहेबांनंतर दसरा मेळाव्यातील ‘या’ पाच घटना ज्याने शिवसेनेत निर्माण झाली अस्वस्थता )

आमदारांची नाराजी काय?

नव्या मुख्यमंत्री निवडीसाठी आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. त्यामुळे एकाच वेळी 92 आमदारांनी आपला राजीनामा विधानसभाध्यक्षांकडे सोपवला आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे राजस्थानमधील काॅंग्रेसचे सरकार अस्थिर झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here