मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या प्रयत्नांना पायलटचा ‘खो’, बंडखोरीमुळे राजस्थान काँग्रेस हताश

224
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या प्रयत्नांना पायलटचा 'खो', बंडखोरीमुळे राजस्थान काँग्रेस हताश
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या प्रयत्नांना पायलटचा 'खो', बंडखोरीमुळे राजस्थान काँग्रेस हताश

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या आश्वासनावर अविश्वास दाखवित राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा बंडखोरीचा झेंडा फडकविला आहे.

२०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी आसुसलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी वाईट बातमी आहे. राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आणि या निवडणुकीकडे लोकसभेची सेमी फाईनल म्हणून बघितले जात आहे.

परंतु, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पुन्हा एकदा पक्षाविरूध्द बंडखोरी करण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील छत्तीसचा आकडा कुणापासूनही लपून नाही. दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय करिअर संपविण्यासाठी टपून बसले आहेत.

(हेही वाचा – Narendra Modi : संसद भवन उद्घाटन बहिष्कार नाट्यावर पंतप्रधान मोदी यांनी सोडले मौन; म्हणाले…)

राजस्थानमधील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना सचिन पायलट यांनी वेगळी वाट धरल्यामुळे काँग्रेसला निवडणुकीतल्या परफॉर्मंसची काळजी सतावत आहे. गहलोत आणि पायलट यांच्यातील वाद संपविण्यासाठी हायकमांडने अलिकडेच दिल्लीत बैठक बोलाविली होती. यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविण्याचे पूर्ण प्रयत्न केले.

अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असून दोन्ही नेते निवडणुकीच्या कामाला एकजुटीने लागले असल्याचे वृत्त काँग्रेसकडून जारी करण्यात आले होते. परंतु, दोन दिवस उलटत नाही तोच पायलट आपल्या मूळ स्वरुपात दिसून येवू लागले. गहलोत यांच्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समझोता झालेला नाही, असे पायलट यांनी टोंक येथील सभेत जाहीर केले.

मुख्यमंत्री गहलोत यांनी भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करायला पाहिजे. कारवाईचे आश्वासन दिले आहे आणि आता आम्ही कारवाई कधी होते याकडे लक्ष ठेवून आहोत. तरुणांना न्याय हवा आहे, अशा शब्दात पायलट यांनी राजस्थान काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसल्याचे लोकांच्या निदर्शनात आणून दिले. एकंदरीत खरगे आणि राहुल गांधी यांच्या प्रयत्नांवर पायलट यांनी विरजण सोडले असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.