BJP चा ओबीसी मतदार तोडण्याबरोबरच पुस्तक खपवण्याचा चीप पब्लिसिटी स्टंट?

103
BJP चा ओबीसी मतदार तोडण्याबरोबरच पुस्तक खपवण्याचा चीप पब्लिसिटी स्टंट?
BJP चा ओबीसी मतदार तोडण्याबरोबरच पुस्तक खपवण्याचा चीप पब्लिसिटी स्टंट?

२०२४ लोकसभा निवडणुकीवर राजदीप सरदेसाईंनी (Rajdeep Sardesai) घाईघाईत पुस्तक लिहून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारात ते प्रकाशित करण्याचा घाट घालण्यामागचा हेतू नक्की काय, असा सवाल लोकं उपस्थित करत आहेत. त्याला कारणंही तशीच आहेत. (BJP)

राजदिप सरदेसाईंच्या (Rajdeep Sardesai) पुस्तकात भुजबळांबद्दल मोठं विधान केलं आहे. “माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी वैयक्तिक चर्चेत दिल्याची नोंद सरदेसाई यांच्या पु्स्तकात आहे.(BJP)

सोशल मीडियावरू तर सरदेसाईंची यावरून शाळा केली गेली आहे. ही फक्त राजकीय टिप्पणी आहे की सध्याच्या भाजपाच्या ‘प्रो ओबीसी’ राजकारणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न, की पुस्तकासाठी चीप पब्लिसिटी? असा थेट प्रश्न विचारला जात आहे.

सरदेसाईंचा खोटारडेपणा पुन्हा उघड

सरदेसाईंच्या (Rajdeep Sardesai) दाव्याची पोलखोल करत छगन भुजबळ म्हणाले, “ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर गेलो, असा आरोप आमच्यावर नेहमीच झाला. परंतु, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. आणि, तीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना! याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले होते. आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर आलो होतो. महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ५४ लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्या सर्वांवर काय ईडीची चौकशी सुरू नव्हती. आम्ही फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील झालो होतो. त्याचा फायदा विकासासाठी आम्हाला झालेला आहे.”

भाजपाचा (BJP)ओबीसी मतदार तोडण्यासाठीचा डाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआ आणि महायुतीच्या भूमिका आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परस्परविरोधी आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे मराठा नेते मनोज जरांगेंशी घरोब्याचे संबंध असून भेटीगाठीही झाल्या आहेत, तसे आरोपही झालेत. दुसरीकडे भाजपने (BJP) आपला डीएनए ओबीसींचा असल्याचं अनेकदा म्हटलंय. मराठा समाजाची मागणी ही ओबीसीतून आरक्षण मिळावी, अशी आहे. ओबीसी नेत्यांचा याला विरोध आहे.

मराठा मतं लोकसभेत जशी एकगट्ठा होती, तशी विधानसभेत राहिलेली नाहीत. आता जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलंय. तुलनेत लोकसभेनंतर ओबीसी आंदोलन मजबूत होत गेलंय. भुजबळ महायुतीचा भाग असून ओबीसी आरक्षण रक्षणासाठी त्यांनी जरांगेविरूद्ध रोखठोक भूमिका घेतली आहे.

त्यामुळे, भुजबळांचा चेहरा वापरून दादा गटासह भाजपाही ओबीसी मतं आपल्या पारड्यात पडतील अशी अपेक्षा लावून आहे. अशात भाजपाने ओबीसी नेते छगन भुजबळ यांना ईडीचा धाक दाखवून त्रास दिला, असं नरेटिव्ह उभं करण्याचं काम सरदेसाईंच्या पुस्तकातून करण्यात आलं आहे. ओबीसींना भाजपा (BJP) व महायुतीपासून दूर नेण्यासाठीच असं नरेटिव्ह उभं केलं जातंय का? असा प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारला जातो आहे. (BJP)

पुस्तकासाठी निवडणुकीचा मुहूर्त का?

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सहा महिने झाले. आत्ता विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात असतानाच हे पुस्तक का प्रकाशित झालं? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “निवडणुकीच्या वेळेलाच हे का छापले जात आहे, याबद्दल आश्चर्य वाटते. मी ते पुस्तक वाचलेले नाही. त्यात काय लिहिलेले आहे, हे नंतर पाहीन. सध्या माझे लक्ष प्रचारावर आहे. तसेच आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातलेल्या आहेत, त्याला निश्चितच आम्ही कायदेशीर उत्तर देऊ.”

खोटेपणाचा सरदेसाईंचा इतिहास

राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार असले तरी त्यांच्या दीर्घ अनुभवाप्रमाणेच त्यांचं वादांसोबत नातंही दीर्घ आहे. २०२१ ला दिल्लीत शेतकरी आंदोलन घडलं. त्यावेळी प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी एका शेतकऱ्याला गोळी घालून ठार मारल्याचं चक्क खोटं ट्वीट करत सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टोकाची टीका केली होती. ही माहिती खोटी असल्याचं नंतर समोर आलं आणि सरदेसाईंनी लगेचच ट्वीट डिलीटही केलं. सरदेसाईंवर त्यांच्या माध्यमसंस्थेने दोन आठवड्यांच्या निलंबनाची कारवाईही केली होती. त्यानंतर उपरती झालेल्या सरदेसाईंनी या घटनेबाबत जाहीर माफी मागितली होती. अशा प्रकारच्या घटनांमुळे सरदेसाईंच्या विश्वासार्हता वारंवार शंका उपस्थित केली जाते. त्यामुळेच त्यांचे भुजबळांवर चिखलफेक करणारे नवे पुस्तक म्हणजे चीप पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.