Rajnath Singh आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची चर्चा; प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या मुद्यांवर विशेष लक्ष

दोन्ही नौदलाचे कर्मचारी प्रशिक्षण भेटी, विषय तज्ञांची देवाणघेवाण, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक संवादात सहभाग यावर चर्चा झाली.

201
Rajnath Singh आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची चर्चा; प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या मुद्यांवर विशेष लक्ष

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सोमवारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. द्विपक्षीय, प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या मुद्यांवर ही चर्चा झाली. यापूर्वी नवी दिल्ली येथे नोव्हेंबर २०२३ मध्ये या दोघांनी मंत्रीस्तरीय संवाद साधला होता.

(हेही वाचा – Indian Navy: भारत-अमेरिका यांच्या संयुक्त सरावाला प्रारंभ)

संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी केले भारतीय नौदलाचे कौतुक :

राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारत युनायटेड स्टेट्स डिफेन्स ऍक्सलरेशन इकोसिस्टिम (इंडस- एक्स) शिखर परिषद आणि आज भारतात सुरू झालेला ‘टायगर ट्रम्फ’ हा ट्राय-सर्व्हिस सराव या द्विपक्षीय कार्यक्रमांचा आढावाही घेतला.हिंद महासागर क्षेत्रातील चाचेगिरीला लगाम घालण्यासाठी भारतीय नौदलाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक लॉईड यांनी केले.

(हेही वाचा – Pakistan Afghanistan Conflict : पाकचे अफगाण क्षेत्रात हवाई हल्ले, ८ जणांचा मृत्यू)

संरक्षण उद्योग सहकार्याविषयी चर्चा :

भारत-अमेरिका संरक्षण (Rajnath Singh) सहकार्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करता येईल या विषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारतीय शिपयार्डमध्ये असलेल्या अमेरिकी नौदलाच्या जहाजांच्या दुरुस्तीसारख्या इतर संरक्षण उद्योग सहकार्याविषयीच्या मुद्यांवरही यावेळी थोडक्यात चर्चा झाली. (Rajnath Singh)

(हेही वाचा – Telangana Governor : तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांचा राजीनामा; लोकसभा निवडणूक लढवणार ?)

याशिवाय, दोन्ही नौदलाचे कर्मचारी प्रशिक्षण भेटी, विषय तज्ञांची देवाणघेवाण, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक संवादात सहभाग यावर चर्चा झाली. (Rajnath Singh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.