मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला; Raju Waghmare यांची खरमरीत टीका

195
मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला; Raju Waghmare यांची खरमरीत टीका

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री भेटीत पालघर येथील साधु हत्याकांड बाबत सर्वप्रथम उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कान टोचायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त करत खरंतर मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा त्यांनी आपल्या राजकारणासाठी वापर केला अशा खरमरीत शब्दांत शिवसेना सह मुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना टीका केली. (Raju Waghmare)

शंकराचार्य म्हणाले “खरा हिंदू विश्वासघात करीत नाही” तेच वाक्य पकडून डॉ. वाघमारे (Raju Waghmare) पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असे पर्यंत कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतो सांगून स्वत: मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकावली हा विश्वासघात नव्हता का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन लाखो शिवसैनिकांना फसवले हा विश्वासघात करणारे उद्धव ठाकरे हे शंकराचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे मग हिंदू कसे असू शकतात? असाही खडा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. (Raju Waghmare)

(हेही वाचा – DCM Devendra Fadanvis: आषाढी एकादशीनिमित्त ‘बा पांडुरंग’ आणि वारकरी माऊलींना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन)

लोकसभा निवडणुकीत हिरवे झेंडे फडकवत विशिष्ट समाजाच्या लोकांना सोबत घेऊन देखील उद्धव ठाकरेंना स्वत:चा स्ट्राईक रेट राखता आला नव्हता. निवडणुकीत घसरलेला मतांचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी त्यांनी शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येत असून यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. या नकली शिवसेनेला असली शिवसेना करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न “उद्धव ठाकरे” यांनी शंकराचार्यांच्या मदतीने केला असा आरोपही डॉ. वाघमारे यांनी केला. (Raju Waghmare)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गक्रमण करत असून आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात. पण हिंदूत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे डॉ. वाघमारे यांनी नमूद केले. हिंदुत्वाबाबत मनात जराही आस्था नसणारे राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार हे सांगत राज्यातील काँग्रेस नेते नाचत होते. मात्र वारीसाठी, वारकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा माऊली साठी वेळ नसल्याचे कारण देऊन राहुल गांधी यांनी लाखो वारकऱ्यांचा व तमाम मराठी जनतेचा अपमानच केल्याची टीकाही डॉ. वाघमारे यांनी केली. (Raju Waghmare)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.