राज्यसभा निवडणुकीत घोडेबजार थांबविण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीलाच फॉर्म्युला सांगितला आहे. आम्हाला घोडे बाजार करायचा नाही, आमचे तीनही उमेदवार राज्यसभेत निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन आणि त्यांचे तीन, त्यांनी एक उमेदवार मागे घेतल्यास घोडेबाजार होणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देशात राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत असून 10 जूनला मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील 6 जागांचा समावेश आहे.
(हेही वाचा – आर्यन खानच्या सुटकेनंतर समीर वानखेडे म्हणाले; “मी नकारात्मक…”)
यापुढे फडणवीस असेही म्हणाले, आमचे तीन खासदार राज्यसभेत जातीलच. त्याबाबत कोणतीच झिकझिक होणार नाही. आमचे तीन खासदार होते. तिन्ही खासदार संसदेत पाठवणार आहोत. यामध्ये खरेदी-विक्री, घोडेबाजारचा प्रश्चनच येत नाही. दरम्यान, भाजपकडून सोमवारी, धनजंय महाडिक, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांनी सत्ताधाऱ्यांना देखील आवाहन केले आहे.
तसेच फडणवीस म्हणाले, जरी त्यांनी तिसरा उमेदवार ठेवला, तरी काही फरक पडणार नाही, आमचे उमेदवार निवडून येणार आहेत, ते महाराष्ट्रातील असून भाजपचे आहेत, राजकीय सक्रीय आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, सद्सद्वविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील, ज्या अर्थी आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला आहे. त्या अर्थी निश्चित आम्ही विचार केला आहे आणि निवडून आणू, असेही त्यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community