Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या १५ पैकी १० जागांवर भाजपा विजयी

देशातील १२ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर कर्नाटकच्या ४, उत्तर प्रदेशच्या १० आणि हिमाचलप्रदेशची एक अशा १५ जागांसाठी मंगळवारी मदतान झाले.

519
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या १५ पैकी १० जागांवर भाजपा विजयी

देशातील हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2024) १५ जागांसाठी मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मतदान झाले. यात १५ पैकी १० जागांवर भाजपा विजयी झाली आहे. यात उत्तरप्रदेशातून ८, हिमाचल आणि कर्नाटकातून भाजपाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर उत्तरप्रदेशातून समाजवादी पक्षाला २ आणि कर्नाटकातून काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत.

(हेही वाचा – CAA Act : केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार ?)

सर्वात चुरशीची निवडणूक हिमाचलप्रदेशात झाली :

देशातील १२ राज्यांमधल्या राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2024) ५६ जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर कर्नाटकच्या ४, उत्तर प्रदेशच्या १० आणि हिमाचलप्रदेशची एक अशा १५ जागांसाठी मंगळवारी मदतान झाले. यात उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपाने ८ जागा जिंकल्या तर सपाला २ जागांवर समाधान मानावे लागले. कर्नाटकच्या ४ जागांपैकी काँग्रेस ३ आणि भाजप एका जागेवर विजयी झाली. सर्वात चुरशीची निवडणूक (Rajya Sabha Election 2024) हिमाचलप्रदेशात झाली. येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत असूनही काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. हिमाचलप्रदेशात काँग्रेसच्या ९ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपाचे हर्ष महाजन विजयी झाले आहेत. काँग्रेस सत्तेत असूनही अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Vivo V30 : विवो व्ही३० भारतात लाँच होण्याच्या तयारीत)

क्रॉस व्होटिंगमुळे आम्ही थक्क – मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खु

हिमाचलप्रदेशाच्या निवडणूक (Rajya Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खु म्हणाले की, एकूण ९ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. यात ३ अपक्ष आणि ६ काँग्रेस आमदारांनी भाजपाला मतदान केले. त्यांच्या या वर्तनामुळे आम्ही थक्क आहोत. हिमाचलप्रदेशची ही संस्कृती नसल्यामुळे आमदारांनी असे का केले हा प्रश्न सतावत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Rajya Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.