राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भारतीय जनता पक्ष आणि रालोआतील घटक पक्षांनी विरोधी पक्षाचा धुव्वा उडविला आहे. राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील ११ जागांवर रालोआने दणदणीत विजय मिळविला आहे. काँग्रेसच्या वाट्याला फक्त एक जागा आली आहे.
काँग्रेसला फक्त एक जागा
ही निवडणूक नऊ राज्यांमधील १२ जागांसाठी झाली होती. भाजपाच्या नऊ मित्रपक्षांचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पराभवाचा सामना करणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी तेलंगणातून निवडणूक जिंकण्यात यश मिळविले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी राजस्थानमधून निवडणूक जिंकली आहे. (Rajya Sabha Election)
(हेही वाचा – Haryana Assembly Election : भाजपा पुन्हा खासदारांना विधानसभेसाठी रिंगणात उतरविणार?)
राज्यसभेत बहुमत
महत्त्वाचे म्हणजे, केंद्र सरकारचे राज्यसभेत बहुमत नव्हते. यामुळे कोणतेही विधेयक पारित करायचे झाले तर सरकारला तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र या निवडणुकीमुळे राज्यसभेतील चित्र पालटले आहे. रालोआ आता बहुमतात आहे. आता केंद्र सरकारला ही विधेयके वरिष्ठ सभागृहात मंजूर करून घेणे सोपे होणार आहे. राज्यसभेच्या एकूण २४५ जागा आहेत. सध्या आठ जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकूण सदस्य संख्या २३७ वर आली आहे. त्याच वेळी, बहुमताचा आकडा देखील ११९ पर्यंत कमी झाला आहे. (Rajya Sabha Election)
रालोआ ११२ वर
आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर राज्यसभेत भाजपाच्या सदस्यांची संख्या ९६ आहे. त्याचबरोबर एनडीएच्या खासदारांची संख्या ११२ झाली आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांची संख्या ८५ झाली आहे. एनडीएला सहा नामनिर्देशित आणि एका अपक्ष राज्यसभा खासदाराचाही पाठिंबा मिळाला आहे. अशा प्रकारे एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. (Rajya Sabha Election)
(हेही वाचा – Congress : खरगे यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत येणार?)
कोण कुठून जिंकले?
नऊ सदस्यांसह राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे पक्षाला विधेयक मंजूर करणे सोपे होणार आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे धैर्यशील पाटील, राजस्थानमधून रवनीत सिंग बिट्टू, हरियाणातून किरण चौधरी, बिहारमधून मनन मिश्रा, आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन, ओडिशातून ममता मोहंता आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्य बिनविरोध विजयी झाले. निवडणूक जिंकली आहे. भाजपाचे मित्रपक्ष असलेले उपेंद्र कुशवाह हे बिहारमधून तर अजित पवार यांच्या पक्षाचे नितीन पाटील महाराष्ट्रातून निवडणूक जिंकले आहेत. (Rajya Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community