Rajya Sabha Election : भाजपचा चौथा उमेदवार राज्यसभेवर, महाविकास आघाडीला धक्का

राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे.

483

सुजित महामुलकर

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार भाजपच्या वाटेवर असून राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे आता सहापैकी चार उमेदवार निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महाविकास आघाडीला यामुळे मोठा धक्का बसणार आहे. मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दम देताच राऊतांनी गुंडांसोबतचे फोटो टाकणे केले बंद; काय म्हणालेले मुख्यमंत्री?)

चर्चांना पूर्णविराम

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे आपल्या काही समर्थक आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात होत होती. आज (सोमवार, १२ फेब्रुवारी) चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Rajya Sabha Election)

काँग्रेसचे संख्याबळ असून उमेदवार पडणार

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी या महिनाअखेरीस मतदान होत असून काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असून एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, अशी बिकट स्थिती पक्षाची झाली आहे.

(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण नॉट रिचेबल; भाजपमध्ये प्रवेश करणार?)

भाजपचा चौथा उमेदवार राज्यसभेत?

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांपैकी भाजप ३, आणि कॉँग्रेस, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) यांची प्रत्येकी एक जागा असे निवडून येईल इतके संख्याबळ आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान न होता, मतपत्रिका दाखवून मतदान करावे लागते. त्यामुळे भाजपने चौथा उमेदवार दिलाच तर त्याला कॉँग्रेसची मते मिळतील आणि भाजपचा चौथा उमेदवारहि निवडून येईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde), नारायण राणे (Narayan Rane), विजया राहाटकर (Vijaya Rahatkar) या चार नेत्यांपैकी तिघांना उमेदवारी मिळू शकते तर चौथ्या जागेसाठी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

सहा खासदारांचा कार्यकाळ संपला 

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातून शिवसेनेचे (आताचा ऊबाठा पक्ष) अनील देसाई (Anil Desai), भाजपचे प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar), नारायण राणे (Narayan Rane) आणि व्ही. मुरलीधरण, कॉँग्रेसचे कुमार केतकर (Kumar Ketkar) आणि राष्ट्रवादीच्या (आताचा राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) वंदना चव्हाण या सहा खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत.

(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांची बोलकी प्रतिक्रिया… आगे आगे देखो होता है क्या…)

शिवसेनेकडून देवरा जवळपास निश्चित

कॉँग्रेसमधून (Congress) नुकतेच आयात झालेले मिलिंद देवरा (Milind Deora) यांचे नाव शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निश्चित झाल्यासारखेच आहे. देवरा यांना दिल्लीला पाठवून शिंदे यांच्या शिवसेनेला निश्चितच त्याचा लाभ होईल. देवरा यांचे अन्य राज्यातील पक्षांशी, नेत्यांशी असलेले संबंध, पक्षाची देश पातळीवर भूमिका काय असावी, तसेच अन्य विषयाबाबत शिवसेनेची भूमिका देशभर पोहोचवण्यास मदतंच होईल. या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला साधारण ४२ मतांची गरज असून शिवसेनेकडे ३९ आमदार आणि अन्य अपक्ष तर राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत. कॉँग्रेसचे ४५ आमदार असून त्यांचा उमेदवार दिल्लीहून ठरवला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र मुंबईतील माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांचेही नाव चर्चेत आहे. (Rajya Sabha Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.