Rajya Sabha Election : मतमोजणीला होणार विलंब, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार

123
राज्यसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रकानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरु होणार होती, मात्र त्याच वेळी भाजपने मतदानाच्या प्रक्रियेवर घेतलेले आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने नोंदवून घेतले आहेत आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब होणार आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीने परस्परविरोधात घेतला आक्षेप 

शुक्रवारी, १० जून रोजी राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली, मात्र या दरम्यान भाजपने आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांची मतपत्रिका पोलिंग एजंटला नुसते दाखवणे अपेक्षित असताना त्यांनी ती एजंटच्या हातात दिली. त्यावर भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मतपत्रिका हातात दिल्याचा आरोप केला.

आयोगाची सुनावणी सुरु 

या सर्व प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी सुरु केली. त्यामुळे मतमोजणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थगिती आणली. त्यामुळे आता यावर केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, जर मतदान बाद झाले तर त्याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.