भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र! काँग्रेसच्या त्यावेळीच्या आक्षेपाची करून दिली आठवण

100
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र त्यानंतर लागलीच भाजपने तीन मतांवर आक्षेप घेतला, केंद्रीय निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली. त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया  होणार तितक्यात भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, याची दखल आयोगाने घेतली आणि मतमोजणी प्रक्रिया थांबवली. तसेच मतदान प्रक्रियेचा व्हिडिओ मागवला आहे. यामुळे आक्षेप घेतलेली महाविकास आघाडीची तीन मते अडचणीत आलेली आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने त्यांच्या पत्रात २०१७ साली गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचा दाखल दिला. त्यावेळी काँग्रेसच्या २ आमदारांनी क्रॉस वोटींग करत भाजपला मत देत बाहेर येऊन भाजप नेते अमित शहा यांना संकेत दिला. तेव्हा काँग्रेस आक्षेप घेतला. त्यावर निवडणूक आयोगाने या आमदारांची मते रद्द केल्याने भाजपचा उमेदवार हरला आणि काँग्रेसने अहमद पटेल निवडून आले.

काय संदर्भ आहे भाजपच्या पत्राचा?   

२०१७ साली गुजरातमध्ये राज्यसभेच्या ३ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे केंद्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली राज्यसभेची निवडणूक होती. त्यावेळी दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित होता, मात्र तिसऱ्या जागेवर अनिश्चितता होती, तरीही भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला होता, तर काँग्रेसने अहमद पटेल यांना उमेदवारी दिली होती. ४५ मतांची बेगमी करायची होती, निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यावर बाहेर येऊन अमित शहा यांना व्हिक्ट्री साईन दाखवली म्हणून काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही दोन मते बाद ठरली होती. त्यामुळे अहमद पटेल निवडून आले होते.

भाजपने काय घेतला आक्षेप?

भाजपने घेतलेल्या आक्षेपाची दाखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर या तीन आमदारांनी त्यांची मतपत्रिका पोलिंग एजंटला दाखवली, असा आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही मते रद्द करण्यात यावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाणे याची दखल घेत त्यांनी मतदान प्रक्रियेतील व्हिडीओ क्लिप मागवली आहे. त्यामुळे आता मतमोजणी प्रक्रिया थांबलेली आहे. त्यात जर महाविकास आघाडीतील तीन मते रद्द झाली तर याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. तरीही ऐनवेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आमदारांना उरलेली मते देण्याच्या निर्णय घेतला, तसाच निर्णय काँग्रेसनेही घेतला होता, त्यामुळे दोन्ही उमेदवार निवडून येतील, शिवसेनेचे संजय पवार यांची अडचण वाढणार आहे. आधीच एनसीपीची नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतांचा अधिकार नाकारण्यात आला होता, तर शिवसेनेचे रमेश लटके दिवंगत झाल्याने एक मत कमी झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.