Rajya Sabha Election : चार राज्ये, १६ जागा आणि चारही राज्यांत आक्षेप

114
देशभरात शुक्रवारी, १० जून रोजी राज्यसभेच्या १६ जागांवर निवडणूक झाली, महाराष्ट्र, राजस्थान, हरयाणा आणि कर्नाटक या चार राज्यांत ही निवडणूक झाली, त्यापैकी राजस्थानमध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार निवडून आले, मात्रया चारही राज्यांत मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला, यातील राजस्थान वगळता उर्वरित तीन राज्यांतील मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आणि भाजप परस्परविरोधी आक्षेप  

भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि  यशोमती ठाकूर या तीन आमदारांनी त्यांची मतपत्रिका पोलिंग एजंटला दाखवली, असा आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही मते रद्द करण्यात यावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाणे याची दखल घेत त्यांनी मतदान प्रक्रियेतील व्हिडीओ क्लिप मागवली आहे. तर महाविकास आघाडीनेही सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे.

राजस्थानात क्रॉस व्होटिंग

तिकडे राजस्थानात 4 जागांसाठी 199 जणांनी मतदान केले, पण यात भाजपचे आमदार शोभाराणी कुशवाह चर्चेत राहिले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले आणि त्यामुळे त्यांचे मत बाद झाले. पण अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात तिथे काँग्रेसचे मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी हे तिघेही विजयी झाले.

हरयाणात राजकीय नाट्य

हरयाणातही राजकीय नाट्य सुरु होते. तिथे राज्यसभेच्या दोन जागांसाठी 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केले. पण काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचा दावा भाजपने केला आणि महाराष्ट्राप्रमाणेच तिथलाही निकाल लांबला. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसची दोन मते रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे काँग्रेसचे अजय माकन यांची जागा धोक्यात आली आहे. त्या विरोधात काँग्रेसनंही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

कर्नाटकात क्रॉस व्होटिंग

कर्नाटकातही चार जागासाठी मतदान झाले पण चर्चा झाली ती जनता दल सेक्युलरच्या एका आमदाराची. के. श्रीनिवास गौडा या जेडीएसच्या आमदारने थेट काँग्रेसला मत दिले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले. पण तिथेही निकाल लांबला. खरेतर, कर्नाटकात 4 पैकी भाजप दोन, काँग्रेसची 1 जागा निश्चित होती. चौथ्या जागेवर काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये लढत झाली. पण क्रॉस वोटिंगमुळे हीच जागा फसली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.