राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. याकरता शिवसेनेने दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे. याकरता महाविकास आघाडीच्या दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक हॉटेल ट्रायडेंट येथे होणार आहे. अशा प्रकारे एकेक मताला महत्व प्राप्त झाले असताना महाविकास आघाडीला दोन मतांना वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ईडीने केला विरोध
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावे याकरता मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. त्याकरता एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी विनंती केली आहे. त्यावर बुधवारी, ८ जून २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी मलिक आणि देशमुख यांना एक दिवसाचा जामीन मिळणार का, यावर फैसला होणार आहे. मात्र त्याआधीच ईडीने याला विरोध केला आहे. पीएमएलए विशेष न्यायालयात ईडीने तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे जर ईडीने केलेला विरोध न्यायालयाने ग्राह्य धरला तर मात्र महाविकास आघाडीला २ मतांपासून वंचित राहावे लागणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपाकडे २२ अतिरिक्त मतं असून अन्य ७ आमदारांचा पाठिंबा आहे. असे एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला ही १३ मतांची गरज आहे.
Join Our WhatsApp Community