आता वर्षभर पराभवाची कारणे सांगत बोटे मोडत बसा! भाजपचा राऊतांना टोला

192

राज्यसभेच्या निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आहे. महाविकास आघाडीच्या जोरावर त्यांनी दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करून मागील २४ वर्षानंतर राज्यात निवडणूक घेण्यास भाग पाडले आहेत. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. या पराभवामागे जे कोणी कारणीभूत आहेत, त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत दोषारोप करू लागले आहेत. राऊतांच्या या नव्या अवतारावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

राऊतांच्या आरोपांचे बुम्बरँग 

या निकालानंतर संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष आमदारांवर आरोप केले. त्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही असे सांगत त्यांनी त्यांनी आरोपाच्या कोठडीत उभे केले. राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत अपक्ष आमदार विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असेही राऊत म्हणाले. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर आता पुन्हा बुम्बरँग झाले आहे.

(हेही वाचा आता मी धोका पत्करू इच्छित नाही! राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश)

काय म्हणाले आमदार भातखळकर? 

यावर भाजपचे आमदार यांनी खरमरीत ट्विट केले आहे. त्यामध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, ‘आमदारांच्या जीवावर पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्या काहींना चाणक्य बनल्याचा गैरसमज झाला होता. तो यापूर्वी सरला नसेल तर राज्यसभेचे निकाल लागल्यानंतर तरी सरायला हवा. एकदा आणि शेवटची सत्ता मिळाली, आता जन्मभर पराभवाची कारणे सांगत बोटे मोडत बसावे लागणार आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.