Rajya Sabha Election 2022: महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी ‘हे’ 7 उमेदवार रिंगणात

93

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील सहा जागांसाठी हे मतदान होणार असून सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. तर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान करणार आहेत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी हे 7 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

  • भाजपचे 3 उमेदवार

  1. पियुष गोयल
  2. अनिल बोंडे
  3. धनंजय महाडिक
  • शिवसेनेचे 2 उमेदवार

  1. संजय राऊत
  2. संजय पवार
  • राष्ट्रवादीचा एक उमेदवार

  1. प्रफुल्ल पटेल
  • काँग्रेसचा एक उमेदवार

  1. इम्रान प्रतापगढ़ी

राज्यसभा निवडणुकीत कोणाचे किती आमदार

महाविकास आघाडी (167)
शिवसेना (55)
राष्ट्रवादी काँग्रेस (51)
काँग्रेस (44)
समाजवादी पक्ष (2)
PJP (2)

भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार

1) प्रकाश आवडे- इचलकरंजी
2) राजेंद्र राऊत- बार्शी
3) महेश बालदी- उरण
4) रवी राणा- बडनेरा
5) विनय कोरे – जनसुराज्य पक्ष
6) रत्नाकर गुट्टे. राष्ट्रीय समाज पक्ष
7) राजू पाटील – मनसे

288 सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनामुळे 287 सदस्य आहेत. कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने तो फेटाळला. दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा फैसला शुक्रवारी सकाळी होणार आहे. या दोघांना मताधिकार न मिळल्यास? पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 41 इतका असेल. मताधिकार मिळाला तर 42 चा कोटा असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.