राज्यसभा निवडणूक ‘अपक्ष’ म्हणून लढवणार; संभाजी राजे छत्रपतींची घोषणा

92

संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. संभाजी राजे म्हणाले की, दोन निर्णय मी घेतले आहेत. पहिला राज्यसभेचा. येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लढवणार, असल्याचे संभाजी राजे म्हणाले. तसेच ही निवडणूक मी अपक्ष लढवणार असल्याचेही संभाजी राजेंनी यावेळी स्पष्ट केले.

मी यापुढे कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. स्वराज्य संघटनेची स्थापना करुन राज्यभर दौरे करणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा करत, राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे, संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

स्वराज्य या नव्या संघटनेची घोषणा

2007 पासून संबंध महाराष्ट्र भ्रमण करत मी महाराष्ट्राच्या लोकांची अवस्था पाहिली. राज्यभर केलेल्या दौ-यानंतर, सर्व समाजबांधवांना काय वाटते, त्यांची भावना जाणून घेऊन पुढील वाटचाल करणार आहे. दरम्यान, पक्षाचे चिन्ह आणि रंग अद्याप ठरला नसल्याचे, संभाजी राजे यावेळी म्हणाले. अनेकांनी केलेल्या विनंतीनंतर मी स्वतंत्र लढणार असून, स्वराज्य संघटित करण्यावर भर देणार असल्याचेही संभाजी राजे यावेळी म्हणाले. त्यांनी स्वराज्य संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

( हेही वाचा: अजब प्रकरण! लग्नाच्या 6 वर्षांनंतरही नातवंड नाही, म्हणून मुलगा आणि सुनेविरुद्ध आई-वडिलांनी घेतली थेट न्यायालयात धाव )

मी पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीसांचा आभारी

संभाजी राजे छत्रपती पुढे म्हणाले की, बहूजन समाजाला जे आरक्षण मिळाले होते, ते सांगण्याची संधी मला मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आल्यानंतर, पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी मला बोलावून विनंती केली, आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे, म्हणून मी ते पद स्वीकारले, त्यांनी संधी दिली त्यासाठी मी प्रथम राष्ट्रपती, पंतप्रधान महोदय, देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. असे खासदार संभाजीराजे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.