Rajya sabha New Rule : संसदेचे हिवाळी अधिवेशन, खासदारांनी पालन करायच्यात ‘या’ सूचना

सर्व राज्यसभा खासदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत सभापती नोटीस मंजूर करत नाहीत आणि इतर खासदारांना कळवत नाहीत तोपर्यंत या नोटिसा सार्वजनिक करू नयेत.

190
Rajya sabha New Rule : संसदेचे हिवाळी अधिवेशन, खासदारांनी पालन करायच्यात 'या' सूचना
Rajya sabha New Rule : संसदेचे हिवाळी अधिवेशन, खासदारांनी पालन करायच्यात 'या' सूचना

हिवाळी अधिवेशनाला सोमवारी (४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे.त्याआधी राज्यसभा खासदारांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कोणतीही प्रसिद्धी करू नये, असे या सूचनांमध्ये लिहिले आहे. सभागृहात धन्यवाद, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा देऊ नका. सभागृहाच्या आत किंवा बाहेर सभापतींवर टीका करता येणार नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे. (Rajya sabha New Rule)

सर्व राज्यसभा खासदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत सभापती नोटीस मंजूर करत नाहीत आणि इतर खासदारांना कळवत नाहीत तोपर्यंत या नोटिसा सार्वजनिक करू नयेत. तसेच, राज्यसभा खासदारांसाठी एप्रिल 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या हँडबुकमध्ये नमूद केलेल्या संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचे स्मरणपत्र देण्यात आले आहे.संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. (Rajya sabha New Rule)

(हेही वाचा : Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनात खासदारांना देण्यात येणार वेद ग्रंथ)

काय दिल्या आहेत सूचना

१) राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्याची प्रसिद्धी केली जाऊ शकत नाही.

२) जो पर्यंत सभापती नोटीस स्वीकारत नाहीत, तोपर्यंत याची माहिती इतर खासदारांना देता येणार नाही. याशिवाय, नोटीस सार्वजनिक करता येणार नाही. विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी जाहीर नोटीस देता येणार नाही.

३) धन्यवाद, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा सभागृहात करता येणार नाही.

४) अध्यक्षांनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका होऊ नये.

५) एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या राज्यसभा सदस्यांसाठीच्या हँडबुकमध्ये नमूद केलेल्या संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचे स्मरणपत्र देण्यात आले.

६) सभागृहात फलक लावण्यास बंदी आहे.

७) अध्यक्षांच्या आसनाची मागील बाजू दाखवू नये.

८) अध्यक्ष बोलत असताना कोणत्याही सदस्याला सभागृह सोडता येणार नाही.

९) सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.

१०) सभागृहात दोन सदस्य एकत्र उभे राहू शकत नाहीत

११) सदस्यांनी थेट अध्यक्षांकडे येऊ नये. ते परिचरांना स्लिप पाठवू शकतात.

१२) सदस्यांनी लिखित भाषण वाचू नये.

१३) सभागृहात सदस्यांची उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे.

१४) एखादा खासदार परवानगीशिवाय ६० दिवस गैरहजर राहिला तर त्याची जागा रिक्त घोषित केली जाणार.

१५) संसदेच्या आवारात धुम्रपान करण्यास बंदी आहे.

१६) सभागृहाच्या कामकाजाची व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे.

१७) नवीन सदस्यांचे पहिले भाषण, मधले स्पीच १५ मिनिट पेक्षा अधिक नसायला हवे आणि मुद्दे सोडून बोलू नये.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.