Rakesh Tikait यांनी ओकली गरळ; म्हणाले, आमची तयारी पूर्ण, भारताचा बांग्लादेश करणार

भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले.

420

बांग्लादेशातील राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी इशारा दिला की, सद्यस्थिती अशीच राहिली तर भारतातही अशीच परिस्थिती दिसू शकते. बांग्लादेशवर 15 वर्षे राज्य करणाऱ्या सरकारने विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवले आणि आता ते सर्व तुरुंगात आहेत. इथेही तेच होईल. शेतकरी आंदोलनाच्या वेळी दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यान धोरणात्मक चूक झाली. आम्ही लाल किल्ल्याकडे मार्गक्रमण केले, जर 25 लाख शेतकऱ्यांनी संसदेवर मोर्चा वळवला असता, तर आम्ही त्याच दिवशी सरकार पडता आले असते. आता आमची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी बांग्लादेशासारखी परिस्थिती करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले. या घटनेच्या माध्यमातून पश्चिम बंगाल सरकारची बदनामी करणे हा षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला. मेरठमधील उर्जा भवन येथे एका मेळाव्याला संबोधित करताना टिकैत यांनी कोलकाता घटनेवरून जे आकांडतांडव सुरु आहे, त्यामागे राज्य सरकार पाडण्याचा आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हेतू आहे.

(हेही वाचा ‘The Diary of West Bengal’ चित्रपटाने मांडले पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भीषण दुःस्थितीचे वास्तव)

बंगाल सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र

मीडिया कव्हरेजमध्ये दुटप्पीपणाचा आरोप करत टिकैत (Rakesh Tikait) म्हणाले की, मणिपूरसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये अशा घटनांकडे लक्ष दिले जात नाही. टिकैत म्हणाले, जेव्हा भाजपाशासित राज्यांमध्ये अशा घटना घडतात तेव्हा कोणीही प्रश्न विचारत नाही. बंगाल सरकारला बदनाम करण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून अपप्रचार केला जात आहे.

सोशल मीडियात संताप

टिकैतच्या टिप्पण्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे, एका नेटिझनने म्हटले आहे की, “त्यांचा हेतू स्पष्ट आहे, आशा आहे की सरकारच्या चांगल्या योजना आहेत.
दुसऱ्या युजरने म्हटले की, ममताबद्दल पोस्ट केल्याबद्दल विद्यार्थ्याला अटक केली जाते, तर राकेश टिकैतला का नाही?”
तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “त्याला आंदोलक म्हटले गेले आहे. त्याला देशाची पर्वा नाही. तो उघडपणे हिंसाचाराच्या धमक्या देत आहे!!”

बलात्कार आणि खून प्रकरण, 10 सदस्य NTF स्थापन

21 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 10 सदस्यीय नॅशनल टास्क फोर्स (NTF) ची स्थापना केली होती. या टास्क फोर्सवर डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रोटोकॉल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.