देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रक्षाबंधनचा सण साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलीस भगिनींनी राखी बांधली. रक्षाबंधनाच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत भगिनीकडून राखी बांधून घेतली आणि हा सण साजरा केला. यासह सर्वसामान्यांसह नेते मंडळी देखील राजकीय वर्तुळातील बहिणींसमान असलेल्या महिलांकडून तर काहिंनी आपल्या बहिणींकडून राखी बांधून हा सण साजरा केला आहे.
(हेही वाचा –भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल – राज्यपाल )
रक्षाबंधनाच्या निमित्ताने मंत्रालयासमोरील पोलीस चौकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनींकडून #राखी बांधून घेत हा पवित्र नात्याचा सण साजरा केला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस, मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.#रक्षाबंधन pic.twitter.com/0XO0K1PoZj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 11, 2022
दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला आहे. गुरूवारी मोदींच्या कार्यालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, शिपाई, माळी आणि ड्रायव्हरच्या मुलींनी मोदींना राखी बांधली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी लहान मुलींसह मोदींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. पीएमओ कार्यालयाकडून याबाबत त्यांनी काही फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मोदींना राखी बांधणाऱ्या या मुली कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु, या मुली पंतप्रधान मोदींसह काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे मोदींसाठीही आजचा दिवस विशेष ठरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp CommunityA very special Raksha Bandhan with these youngsters… pic.twitter.com/mcEbq9lmpx
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2022