Ram Kadam vs Udhav Thackrey : कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? उद्धव ठाकरे, संजय राऊत तुम्ही गप्प का? राम कदम यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

सध्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानबद्दल भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. आता भाजपा नेते राम कदम यांनी या संदर्भात थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

261
Ram Kadam vs Udhav Thackrey : कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? उद्धव ठाकरे, संजय राऊत तुम्ही गप्प का? राम कदम यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

सध्या आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानबद्दल भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. आता भाजपा नेते राम कदम यांनी या संदर्भात थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. जितेंद्र आव्हाडानी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का ? प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे संजय राऊत (Sanjay Raut) गप्प का ? असा संतप्त सवाल राम कदम यांनी केला आहे. (Ram Kadam vs Udhav Thackrey)

नेहमी हिंदुत्वाची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे हे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर काहीच का बोलत नाही. देशभरातील अनेक राम भक्त आणि काही करोडो लोक याबद्दल विचार करत आहेत की उद्धव ठाकरे ही अजून गप्प का किंवा अनेक प्रश्नावर आपले मत नोंदविणारे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत हे ही गप्प का ? इकडे संपूर्ण देशभरात अयोध्याच्या राम मंदिराच्या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात उत्साह असताना दुसरीकडे मात्र इथे हे असे बोलतात तरी तुम्ही शांत का असे अनेक मुद्दे त्यांनी त्यांच्या पत्रात मांडले आहेत. (Ram Kadam vs Udhav Thackrey)

(हेही वाचा : Loksabha election 2024 : राज ठाकरेंच्या १४ संभाव्य शिलेदारांची यादी आली समोर; मात्र स्वबळावर लढणार का?)

काय आहे नमके पत्रात जाणून घेऊया त्यांचे पत्र जसेच्या तसे ..

मा. उद्धव ठाकरे जी

नमस्कार..

मी आपणांस हे पत्र एक हिंदू म्हणून लिहतो आहे.. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही.

आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री अन ज्येष्ठ नेते आहत.. आपल्या घटक पक्षातील नेते श्री. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी आहेत असे म्हटले.. त्यांच्या या राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावरून देशभर आक्रोश सुरु झाला. अनेक आंदोलने निदर्शने झाली. संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला.. त्यानंतर अपेक्षा होती त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती. मात्र त्यांनी माफी न मागता उलट प्रभू राम आणी सीता मदिरा पण करत होते.. नृतांगनाचे नृत्य कसे पाहत होते.. अशी प्रभू रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून अजून तीव्र भावना भडकविण्याचा पर्यन्त केला.आज देशभरातील समस्त संत साधू समाज..करोडो करोडो रामभक्त आश्चर्य व्यक्त करत आहेत. की आपण अथवा आपले प्रवक्ते संजय राऊत गप्प का ?स्वतः मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आव्हाडावर तुटून पडले. त्यांनी दाखवून दिले की तेच खरे स्वर्गीय बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत. मात्र तुम्ही थंड बसलात..? का ? कुठे गेली तुमची हिंदुत्वची भाषा? मर्दूमकी ?का विसर पडला तुम्हांला शिवरायचा ?हा तर प्रचंड गंभीर विषय आहे.. समाजाच्या श्रद्धा आणी आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का ?हा कैक कोटी मिलियन डॉलर चा महत्व पुर्ण प्रश्न हिंदू समाजाला पडला आहे..भगवान रामाची आव्हाडानी केलेली चेष्टा तुम्हांला मान्य आहे का ?अन नसेल तर आपण अजून पर्यंत खंडन का केले नाही..प्रत्येक भाषणात अथवा चर्चेत सुद्धा तुमचा आवडता शब्द.. मर्द… मर्द… किमान 25 वेळा उच्चारल्या शिवाय… किंवा तुमच्या भाषेतकिंबहुना.. कोथळा.. कडे कपारी.. महाराष्ट्र धर्म..कोठे दडलीय ही शब्द संपदा..?त्यामुळे आपण रामभक्ता सोबत आहत की आव्हाडाच समर्थन करता हे देशभरातील संत साधू समाज आणी हिंदू समाजाला कळले पाहिजे..अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की आपणास हिंदू धर्माशी काहीही देने घेणे नाही.आणि होय वेळ मिळाला तर जरूर फेसबुक वर देशभरातील साधू संत आणी हिंदू समाज आपल्या मौन असण्या बाबत काय बोलतो आहे ते जरूर पहा..नाही तर संजय आहेतच तुम्हाला घरं बसल्या सर्व सांगण्यासाठी.. महाभारतातील व्यवस्था आजही आपल्या कडे आहे..

समस्त हिंदूना आपल्या उत्तरांची अपेक्षा.. केवळ .. शाब्दिक कोट्याची नाही..

धन्यवाद

राम कदम

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.